मासळीचे दर वधारल्याने देवगडात खवय्यांची निराशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासळीचे दर वधारल्याने
देवगडात खवय्यांची निराशा
मासळीचे दर वधारल्याने देवगडात खवय्यांची निराशा

मासळीचे दर वधारल्याने देवगडात खवय्यांची निराशा

sakal_logo
By

मासळीचे दर वधारल्याने देवगडात खवय्यांची निराशा
देवगड, ता. १५ : तालुक्यात सध्या मासळीचे दर वधारले आहेत. किमती मासळीचे भाव चांगलेच वाढल्याने खवय्यांची मोठी पंचाईत झाली आहे. दरम्यान, मासळीचे दर कडाडल्याने खवय्यांनी आपला मोर्चा चिकनकडे वळविला आहे.
सध्या येथे मासळीचे दर वाढले आहेत. सुरमई, सौंदाळा, सरंगा यांचे दर वाढल्याने खवय्यांची अडचण वाढली आहे. वर्षअखेरीपासून वाढलेले दर अजूनही खाली आलेले दिसत नाहीत. कोळंबीलाही मागणी असली तरी दर वाढलेले असल्याने खवय्यांच्या खिशाला ताण पडत आहे. मासळीचे दर वाढल्याने खवय्यांची चिकन, अंडी याकडे धाव असते; मात्र चिकन आणि अंडी यांचाही भाव अलीकडे काहीसा वाढला आहे. नेट चिकनचा दर २४० रुपये प्रति किलोपर्यंत गेला आहे, तर अंडी सहा-सात रुपयाने नग विकली जात आहेत. गावठी अंड्यांचा भाव १२ रुपये नग झाला आहे. सततच्या वाढत्या दरामुळे मांसाहारी मंडळींना जादा खर्चाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, यावेळच्या आठवडी बाजारात भाज्यांचे दर स्थिर होते. कोथिंबीर १० रुपये जुडी, कोबी १० ते ३० रुपये नग, फ्लॉवर २० ते ४० रुपये नग विकले जात होते. टॉमेटो १० ते २० रुपये प्रतिकिलो होते.