बॉक्साईट डंपरची रिक्षास धडक, मिटले प्रकरण

बॉक्साईट डंपरची रिक्षास धडक, मिटले प्रकरण

बॉक्साईट डंपरची रिक्षास धडक
मंडणगड ः बॉक्साईटची क्षमतेपेक्षा वाहतूक करणाऱ्या एका दहा चाकी डंपरने शनिवारी (ता.१४) तुळशी घाटाचे परिसरात सायंकाळी एका रिक्षास धडक दिल्याने रिक्षाचालकास किरकोळ दुखापत झाली. अपघातात रिक्षाची काच फुटून मोठे नुकसान झाले. मात्र हे प्रकरण सामंजस्याने मिटवण्यात आले. तुळशी-मंडणगड मार्गावर गेले अनेक दिवस चोवीत तास सुरू असलेल्या विनापरवाना बेकायदेशीर ओव्हरलोड बॉक्साईट वाहतुकीचे विरोधात स्थानिकांनी सातत्याने तक्रार केली आहे. तरीही स्थानिक प्रशासनासह सर्व यंत्रणांनी वाहतुकीचे विरोधात कोणतीही कारवाई न केल्याने आता प्रत्यक्षात अपघात होऊनही याची कल्पना यंत्रणांना मिळालेली नाही. परस्पर सहमतीने अपघातासारखा गंभीर प्रकारही मिटवण्यात आल्याने वाहतूक करणाऱ्यांना आता कायद्याचे कोणतेही भय राहिलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com