
रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त सावंतवाडीत चेकअप कॅम्प
swt१६११.jpg
७५९४२
सावंतवाडीः येथे रोटरी क्लबतर्फे जनरल चेकअप कॅम्पचे आयोजन केले होते.
रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त
सावंतवाडीत चेकअप कॅम्प
सावंतवाडी, ता. १६ ः येथील रोटरी क्लब व पोलीस स्थानक यांच्यावतीने आयोजित ३३ व्या रस्ता सुरक्षा कार्यक्रमा अंतर्गत उजव्या बाजूने चालण्याची व अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी हेल्मेटचा वापर करणे याबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब तर्फे जनरल चेकअप कॅम्पचे ही आयोजन करण्यात आले होते. यासाठी सावंतवाडी आयुर्वेदिक कॉलेज यांचे सहकार्य लाभले. सुमारे १०० हुन अधिक लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
यावेळी आयुर्वेदिक कॉलेजचे एनएसएस प्रमुख डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. जयराम मरकंड, डॉ. सचिन युरनर, डॉ. वैभव राजवण, डॉ. शिवानी सिंह, डॉ. ऋषिकेश सातपुते, डॉ. ऋतिका रासकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजक रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन विनया बाड, सेक्रेटरी प्रमोद भागवत, सुहास सातोस्कर, काशिनाथ दुभाषी यांच्या या उपक्रमाचा सर्वांना लाभ घेता आला.
या कार्यक्रमासाठी येथील पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, नंदकिशोर काळे, आरटीओ सिंधुदुर्ग अधिकारी जावेद शिकळगार, विजयकुमार अकमवार, सचिन पोलाद, संजय केरकर, अभिजीत शिरगावकर, गणेश जाधव, प्रकाश गावडे, संदीप चव्हाण, रुपेश रसाळ, जगदीश राऊळ, बच्चू कन्याळकर, ट्राफिक पोलीस राजाराम राणे, सुनील नाईक, अजित सांगेलकर व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते.