रस्ता सुरक्षा अभियानास सावंतवाडी येथे प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता सुरक्षा अभियानास सावंतवाडी येथे प्रतिसाद
रस्ता सुरक्षा अभियानास सावंतवाडी येथे प्रतिसाद

रस्ता सुरक्षा अभियानास सावंतवाडी येथे प्रतिसाद

sakal_logo
By

swt1610.jpg
75941
सावंतवाडीः शहरात रस्ता सुरक्षा अभियान रॅली काढण्यात आली.

रस्ता सुरक्षा अभियानास
सावंतवाडी येथे प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ः नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजण्यासाठी आज शहरात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ घेण्यात आले. हेल्मेटचे महत्त्व नागरिकांना समजावे तसेच लोकांनी हेल्मेटचा वापर करून स्वतःचा जीव वाचवावा, या उद्देशाने हे अभियान आयोजित केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली.
या अभियानाचा प्रारंभ काळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शहरात हेल्मेट रॅलीही काढण्यात आली. यावेळी सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद्र मेगडे, अधिकारी विजयकुमार अल्लम्मावार, अधिकारी जावेद शिखलगार, सचिन पोलादे, अभिजीत शिरगावकर, सुनील खंदारे, गणेश जाधव, प्रकाश गावडे, संदीप चव्हाण, वाहतूक पोलिस सुनील नाईक, राजा राणे, अभयकुमार मापसेकर, विल्सन, रुपेश रसाळ, आगा, जगदीश, राहुल राठोड, सुधीर पराडकर, धर्मेंद्र सावंत, महादेव बामणे आदी उपस्थित होते.
यावेळी शहरात रस्ता सुरक्षा अभियानाची रॅली देखील काढण्यात आली. या रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे अभियान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग पोलिस यांच्यावतीने येथे राबविण्यात आले.