चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा
चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

चिपळूण-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

समीर कालेकर यांचे पंचपरीक्षेत यश
चिपळूण ः दिल्ली येथे झालेली पंच परीक्षा चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलचे क्रीडाशिक्षक समीर कालेकर उत्तीर्ण झाले.
भारतात कुठेही पंच म्हणून कामगिरी करायची असेल तर ऑल इंडिया पंच परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा दिल्ली येथे झाली. रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव कालेकर विशेष गुणवत्तेने ऑल इंडिया पंच परीक्षा पास झाले आहेत. त्यांना शालेय जीवनापासून कबड्डी खेळाची आवड आहे. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी कबड्डी खेळले आहे. त्यांनी क्रीडाक्षेत्रातील बीपीएड पदवी संपादन केली आणि आजपर्यंत अनेक कबड्डी खेळाडू त्यांनी घडवले आहेत. गेली २० वर्षे कबड्डी या खेळातून कालेकर आपला छंद जोपासत आहेत. अनेक वर्ष विविध जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेत पंच म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आहे.

पेजे महाविद्यालयात
आज युवा महोत्सव
रत्नागिरी ः शिवारआंबेरे येथील श्रमिक विद्यालय व लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयाचा १४ वा झेप युवा महोत्सव मंगळवारी (ता. १७) आयोजित करण्यात आला आहे. या वेळी महात्मा फुले सत्यशोधक सांस्कृतिक सभागृहात सकाळी ९ वा. शामराव पेजे यांची १०६ वी जयंती सोहळा व नूतन इमारत उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्यात निवृत्त शिक्षक सुदाम आंब्रे यांच्या जीवन जगता यावे म्हणून या पुस्तकाचे प्रकाशन श्रमिक किसान सेवा समिती अध्यक्ष नंदकुमार मोहिते यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी (कै.) केरोपंत मजगावकर ट्रस्ट मुख्य विश्वस्त शशिकांत रसाळ, बी. जी. ठुकरूल, नरेंद्र घाणेकर, नारायण आग्रे, अनंत पेजे उपस्थित राहणार आहेत.


भटाळीत बुधवारपासून विष्णूयाग
राजापूर ः जनकल्याणार्थ आणि सर्वारिष्ट शांत्यर्थ राजापूर संस्कृत पाठशाळा आणि राजापूर ब्रह्मवृंद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विष्णूयाग‘ १८ ते २० जानेवारी या कालावधीमध्ये शहरातील भटाळी येथील श्रीलक्ष्मीकेशव मंदिरामध्ये होणार आहे. बुधवारी उदकशांत, प्रायश्‍चित्त, प्रधानसंकल्प, पुण्याहवाचन, मातृकापूजन, देवनांदी श्राद्ध, श्रीलक्ष्मीकेशव देवता ६४ उपचार पूजा, मुख्यदेवता स्थापना, तर गुरुवारी आवृत्या जप अभिषेक, अग्निस्थापना, ग्रहस्थापना व हवन, सायंकाळी साडेसहा वाजता हभप निशिकांत बुवा टेंगशे पैंगीण गोवा यांचे कीर्तन, शुक्रवारी हवन, बलिदान, पूर्णाहूती, अभिषेक, ब्राह्मण मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभ, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. यज्ञप्रेमींनी व भाविकानी उपस्थित राहावे, असे आवाहन राजापूर ब्रह्मवृंद व राजापूर संस्कृत पाठशाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.