ग्रुपच्या जुन्या आठवणींना उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रुपच्या जुन्या आठवणींना उजाळा
ग्रुपच्या जुन्या आठवणींना उजाळा

ग्रुपच्या जुन्या आठवणींना उजाळा

sakal_logo
By

75952
बांदा ः शोटाईम ग्रुप स्नेहमेळाव्याचे उद्‍घाटन करताना भाई शिरसाट. शेजारी संजू परब, प्रमोद कामत, प्रियांका नाईक, जावेद खतीब, श्वेता कोरगावकर, शीतल राऊळ, भाऊ वळंजू, नारायण पित्रे आदी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

ग्रुपच्या जुन्या आठवणींना उजाळा

‘बांदा दीपावली शोटाईम’चा स्नेहमेळावा उत्साहात; माजी अध्यक्षांसह मान्यवरांचे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः बांदा शोटाईम ग्रुपचा स्नेहमेळावा व सत्कार सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. महाराष्ट्र व गोव्यासह विविध भागात १९९० पासून सलग २० वर्षे रसिकमनावर राज्य करणाऱ्या बांदा दीपावली शोटाईमच्या आठवणी या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा जागविण्यात आल्या.
स्नेहमेळ्याचे उद्घाटन शोटाईमचे ज्येष्ठ आयोजक भाई शिरसाट यांच्या हस्ते दीपप्रज्वनाने झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे माजी सभापती प्रमोद कामत, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊऴ, प्रसिद्ध व्यापारी भाऊ वळंजू, उद्योजक नारायण पित्रे, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट, माजी अध्यक्ष अनय स्वार, संयोजक मनोज गोवेकर, आयोजक तेजस परब, श्रीप्रसाद वाळके, ज्येष्ठ सदस्य अन्वर खान, सुशांत पांगम, निवेदक धनश्री धारगळकर आदी उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक सभागृहात आयोजित या सोहळ्याचा आरंभी गिरिष महाजन, पुरुषोत्तम पेडणेकर, रवींद्र हरमलकर, संतोष परब, सुशांत नाईक (हार्मोनियम), अजित गवस (तबला) यांनी नांदी म्हणून प्रारंभ केला. नारायण आकेरकर यांनी शोटाईमचे टायटल साँग सादर केले. प्रास्ताविकात रुपाली शिरसाट यांनी शोटाईमच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. त्यानंतर ''नादश्री'' पुरस्कार प्राप्त गोव्यातील नामवंत सिंथेसाईझर वादक विष्णू शिरोडकर, शोटाईमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सदस्य अन्वर खान, संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या साहित्यावर पीएचडी संपादन केलेल्या डॉ. भक्ती महाजन-आळवे, (कै.) डॉ. द. भि. खानोलकर चरित्र पुस्तकाचे लेखक प्रकाश तेंडोलकर यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच मंडऴाचे सर्व माजी अध्यक्ष अनय स्वार, अजय महाजन, राजेश पावसकर, राजेश विरनोडकर, सिद्धेश महाजन, राकेश विरनोडकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना गौरविण्यात आले. संजू परब, प्रमोद कामत, रुपाली शिरसाट, धऩश्री धारगळकर, (कै.) श्रीकांत उर्फ बापू गोवेकर परिवार, बांदा अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुप, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, संयोजक मनोज गोवेकर, सूत्रसंचालक राकेश केसरकर, शोटाईम विशेषांकाचे संपादक आशुतोष भांगले, टायटल साँग गायक नारायण आकेरकर यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी मनोगतात शोटाईमच्या आठवणी जाग्या केल्या. सरपंच प्रियांका नाईक यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. डॉ. भक्ती महाजन-आळवे यांनी ‘एक झाड चंदनाचे’ पुस्तकातील भागाचे वाचन केले. कार्यक्रमस्थळी या पुस्तकाचा स्टॉल लावला होता. त्याला वाचकांचा प्रतिसाद लाभला. राजेश गोवेकर यांनी संपादित केलेली दीपावली शोटाईमची जुनी क्षणचित्रे स्क्रीनवर प्रसारित करण्यात आली. समीर चराटकर यांनी बहारदार गायन सादर केले. यावेळी हनुमंत नाटेकर, आबा नाटेकर, प्रेमानंद महाजन, सुधीर शिरसाट, नंदू गोवेकर, पांडुरंग बांदेकर, साईनाथ तेली, सर्वेश गोवेकर, साई विरनोडकर, संदेश पावसकर, अजिंक्य पावसकर, अर्णव स्वार, प्रथमेश गोवेकर, नाना मिशाळ आदी उपस्थित होते.
--
मान्यवरांची मनोगते
प्रमोद कामत यांनी बांदा शोटाईम हा वैभवशाली ग्रुप असून त्यांनी आपले कार्य अविरत सुरू ठेवावे. त्यासाठी आपले सदैव सहकार्य लाभेल, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात परब यांनी बांद्याच्या शोटाईमची भव्यता, त्याला लाभणारा मोठा जनसहभाग व शोटाईम ग्रुपने दिलेले प्रेम कधीच विसरणार नाही. असा हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा नव्याने नव्या जोशात सुरू होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य लाभेल, अशी ग्वाही दिली.