जुन्या कंत्राटींनीच प्राधान्य द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या कंत्राटींनीच प्राधान्य द्या
जुन्या कंत्राटींनीच प्राधान्य द्या

जुन्या कंत्राटींनीच प्राधान्य द्या

sakal_logo
By

75949
नीलेश खरात, आनंद लाड


जुन्या कंत्राटींनीच प्राधान्य द्या

खरात, लाड ः महावितरण कंपनीची परंपरागत प्रथा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीमधील विविध कार्यालयात वर्षानुवर्षे मंजूर रिक्त पदावर जुन्या वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार एजन्सी बदलल्या नंतर कामावरुन कमी करू नये. नवीन मंजूर रिक्त पदी रोजगार देताना जुन्या कामगाराला प्राधान्य दिले पाहिजे, असे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीत नियमित विविध रिक्त पदांच्या जागेवर अथवा कामाच्या गरजेनुसार कंत्राटदारांच्या मार्फत कंत्राटी कामगार नियुक्त केले जात असतात. कंत्राटदार बदलला तरी त्याच ठिकाणी कंत्राटी कामगार तेच जुने कार्यरत असलेलेच कामगार नेमावेत, ही प्रथा कंपनीत परंपरागत चालू आहे. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या प्रमुख नियोक्ता यांनी दिलेल्या कंत्राटाची मुदत संपल्यानंतर पुन्हा नवीन टेंडर प्रक्रिया राबवली जाते. जो नवीन कंत्राटदार येतो, त्या कंत्राटदार अथवा त्यांच्या हस्तका करवी हस्ते परहस्ते या जुन्या कंत्राटी कामगारांना जॉइनिंग लेटर देण्याच्या बहाण्याने आर्थिक मागणी केली जाते. ही मागणी पूर्ण न करणाऱ्या कामगारांना जॉइनिंग लेटर दिले जात नाही. ही बाब अनेकदा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने ऊर्जामंत्री, प्रधान सचिव ऊर्जा, कामगार आयुक्त, शासननास तसेच तिन्ही वीज कंपनीच्या वरिष्ठ प्रशासनाच्या वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. २७ फेब्रुवारी २०१९ ला माजी ऊर्जामंत्री व प्रधान सचिव ऊर्जा यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेसोबत झालेल्या बैठकीमध्ये एखाद्या कामगारांची तक्रार असल्यास खरेच त्याची चूक आहे का ? हे पडताळून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे अधिकार प्रशासनास दिले आहेत. राज्यातील वीज कंत्राटी कामगारांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा नसल्याने त्यांचे शोषण होत असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ४ जानेवारी २०२३ ला मान्य केले आहे. त्यामुळे आता कंपनीतील विविध कार्यालयात वर्षानुवर्षे मंजूर रिक्त पदावर तसेच गरजेनुसार काम करत असलेल्या जुन्या व अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार एजन्सी बदलल्या नंतर कामावरुन कमी करू नये. नवीन मंजूर रिक्त पदी रोजगार देताना जुन्या कामगाराला प्राधान्य देण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून सर्व संबंधितांना तसेच सर्व कंत्राटदारांना सूचना देण्यात याव्यात. मुंबई उच्च न्यायालय व मुंबई औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संरक्षण दिलेल्या कामगारांना देखील कमी करू नये, याचे देखील पालन प्रशासनाने करणे गरजेचे आहे. यासाठी न्यायालयीन संरक्षित सर्व कामगारांना संपर्क पोर्टलवर विशेषरित्या दर्शवणे देखील आवश्यक आहे.
कंपनीतील कार्यालयात अतिरिक्त नवीन नियमित रिक्त पदे मंजूर झाल्यानंतर विविध ठिकाणी कंत्राटी कामगार भरताना आधीच्या कंत्राटात मंजूर असलेल्या संख्येपेक्षा काही कंत्राटी कामगार जास्त नियुक्त करण्याची ऑर्डर संबंधित कंत्राटदाराला मिळाल्यास त्या वेळी त्या-त्या विभागात कार्यालयात, सीएफसी, सेक्शन, सबस्टेशन अथवा इतर ऑफिसमधून या आधी तेथे पूर्वी काही कारणास्तव कमी झालेल्या अनुभवी व कौशल्य प्राप्त रोजगार मुकावा लागलेल्या जुन्या गरजू वीज कंत्राटी कामगारांनाच प्रशासनाने त्या ठिकाणी प्राधान्याने नियुक्त्या दिल्या पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने या पूर्वीही केली आहे.
---
प्रशासनाने दखल घ्यावी
वीज कंपनीतील एखाद्या कार्यालयात जर कोणता कायम कामगार नवीन भरती झाला अथवा त्यांची बदली, प्रमोशनद्वारे रुजू झाला तर त्याच्या जागी रिक्त मंजूर पदावर कार्यरत कंत्राटी कामगाराला कमी करूच नये. अगदीच ती वेळ आल्यास (एलआयएफओ) या कामगार कायद्यान्वये त्या कंत्राटी कामगाराला कमी करण्याची प्रथा परंपरागत आज चालू आहे. याचे काटेकोर पालन झाले पाहिजे. याची काळजी वीज कंपनी प्रशासनाने घ्यावी.