
ईश्वरी, तनया, सलोनी निबंध स्पर्धेमध्ये प्रथम
ईश्वरी, तनया, सलोनी
निबंध स्पर्धेमध्ये प्रथम
कणकवलीतील निकाल जाहीर
कणकवली, ता.१६ : तालुका पत्रकार समितीतर्फे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला. यात ईश्वरी लाड, तनया कदम आणि सलोनी कदम यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळविले. सर्व विजेत्यांना २१ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
पाचवी ते सातवी गटामध्ये प्रथम - ईश्वरी गोविंद लाड (एस. एम. हायस्कूल, कणकवली), द्वितीय सृष्टी सखाराम तेली (शिवडाव हायस्कूल), तृतीय श्रेया प्रदीप कदम (एस. एम. हायस्कूल, कणकवली) उत्तेजनार्थ प्रांजली राजेंद्र कोलते (जि.प. शाळा नविन कुर्ली वसाहत, फोंडाघाट) व जुई पद्माकर देसाई (आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे) यांनी यश मिळविले.
आठवी ते दहावीच्या गटात प्रथम - तनया प्रवीण कदम (एस. एम. हायस्कूल, कणकवली), द्वितीय ओंकार संजय सदडेकर (शिवडाव हायस्कूल), तृतीय - मयुरेश शाम सोनुर्लेकर (आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे), तर उत्तेजनार्थ साक्षी दयानंद गांवकर (नाटळ हायस्कूल) व मधुरा उज्ज्वल माने (विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली) यांनी यश मिळविले.
महाविद्यालयीन गटात प्रथम - सलोनी अशोक कदम (कणकवली कॉलेज), द्वितीय अलफिया शकील मालीम (कणकवली कॉलेज), तृतीय - प्रज्ञा सत्यवान मेस्त्री (एमएम सावंत ज्यु. कॉलेज कनेडी), तर उत्तेजनार्थ प्रतीक्षा प्रभाकर देसाई (कणकवली कॉलेज) व साधना संजय लाड (कणकवली कॉलेज) यांनी यश मिळविले. या निबंध स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.मनीषा पाटील, निकीता बगळे व चित्राक्षी देसाई यांनी काम पाहिले.