चिपळूण - 12 वर्ष केवळ काम चालू आहे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - 12 वर्ष केवळ काम चालू आहे
चिपळूण - 12 वर्ष केवळ काम चालू आहे

चिपळूण - 12 वर्ष केवळ काम चालू आहे

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१७p३.jpg ः KOP२३L७६१४८ चिपळूण ः येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.
--------------

मुंबई गोवा महामार्गाची रखडकथा-भाग २ ..........लोगो

बारा वर्ष केवळ काम चालू एवढेच उत्तर
मुंबई-गोवा महामार्गाची कुर्मगती ; समृद्धी साडेचार वर्षात पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः गेल्या १२ वर्षापासून सुरू असलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्यापही संपले नाही. प्रवाशांना खाचखळगे, खड्डेमय रस्ते आणि धुळीतूनच वाट काढत ये-जा करावे लागत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग केवळ साडेचार वर्षात होतो; मात्र १२ वर्षानंतरही या महामार्गाचे काम कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही. कोकणवासीयांच्यादृष्टीने ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
या महामार्गाची डिसेंबर २०१० मध्ये घोषणा करण्यात आली. मोदी सरकारने २०१४ मध्ये महामार्गाच्या कामाला सुरवात केली; परंतु प्रत्यक्षात काम सुरू झाले नव्हते. २०१८ मध्ये पहिली जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर यंत्रणांना उत्तर देण्यास बांधिल असल्याने खऱ्या अर्थाने महामार्गाचे काम सुरू झाले; मात्र १२ वर्षानंतर हे महामार्ग पूर्ण झालेले नाही. समृद्धी महामार्ग निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीत पूर्ण व्हावा म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वारंवार बैठका आढावा घेतल्या.

११८ किमी एप्रिल २०२२ मध्ये तयार
पनवेल ते इंदापूरचे काम मे २०२१ पर्यंत ८८.८ टक्के पूर्ण झाले. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी कासू ते इंदापूर (४२ ते ८४ कि.मी) टप्प्यासाठी करारनामा केला आहे. पळस्पे ते कासू (० ते ४२ किमी) या टप्प्यासाठी नव्या कंत्राटदार कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्याला काम करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड ते झाराप हा ११८ किमीचा महामार्ग एप्रिल २०२२ मध्ये तयार झाला आहे. सध्या या महामार्गावरून वेगाने वाहनांची ये-जा सुरू आहे. या परिसरातून जाताना प्रवाशांचा प्रवास वेगाने होत आहे.
-----------
कोट
मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील पर्यटनाचा कणा आहे. महामार्गाचे काम तातडीने पूर्ण झाले नाही तर कोकणातील पर्यटनावर त्याचा परिणाम होईल. पर्यायाने कोकणातील तरुण बेरोजगार होईल. सरकार कोणतेही असो कोकणातील मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष जात नाही हे त्रिवार सत्य आहे.
--योगेश देसाई, चिपळूण

चौकट
महामार्गाच्या कामाचे टप्पे

पनवेल ते इंदापूर ० ते ८४ - ८६ टक्के पूर्ण
इंदापूर ते वडपाले (८४ ते १०८ किमी)- ६१ टक्के पूर्ण मे २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे टार्गेट
वडपाले ते भोगाव खुर्द (१०८ ते १४८)-९० टक्के पूर्ण डिसेंबर २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्याचे टार्गेट
भोगाव खुर्द ते कशेडी (१४८ ते १६१) ८०.८६ टक्के पूर्ण मार्च २०२३ काम पूर्ण करण्याचा कालावधी
कशेडी ते परशुराम घाट (१६१ ते २०५) ९५.२० टक्के पूर्ण जून २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचा कालावधी
परशुराम घाट ते आरवली (२०५ ते २४१) ६२ टक्के पूर्ण जून २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचा कालावधी
आरवली ते कांटे (२४१ ते २८१) २२.०८ टक्के पूर्ण डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचा कालावधी
कांटे ते वाकेड (२८१ ते ३३२) २४.२५ टक्के पूर्ण डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचा कालावधी
वाकेड ते तळेगाव (३३२ ते ३६७) एप्रिल २०२२ मध्ये शंभर टक्के काम पूर्ण झाले
तळेगाव ते कळमट (३६७ ते ४०६) मार्च २०२२ मध्ये शंभर टक्के काम पूर्ण झाले.
कळमट ते झाराप ४०६ ते ४५० मार्च २०२२ मध्ये शंभर टक्के काम पूर्ण झाले.