
''चढणीचे मासे''चे ऑनलाईन प्रकाशन
swt1713.jpg
L76200
गंगाराम गवाणकर
‘चढणीचे मासे’चे ऑनलाईन प्रकाशन
तळेरे : कविता, नाटक हे माझ्या आयुष्यातील हळवे दुवे आहेत. कवितेला विषयाचे बंधन नाही. कविता कधी ठरवून होत नाही. ती कशी फुटते, सुचते, उमलते हा अद्भुत प्रकार आहे. नरेंद्र यांनी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या निसर्गावर, परिस्थितीवर कविता केली आहे, असे प्रतिपादन ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांनी केले. ‘चढणीचे मासे’ या कवी नरेंद्रकुमार चव्हाण यांच्या काव्य संग्रहाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या काव्यसंग्रहाला डॉ. सतीश पवार यांनी प्रस्तावना लिहिली असून डॉ. विठ्ठल गाड व डॉ. नामदेव गवळी यांचे अभिप्राय आहेत. कार्यक्रमात शुभांगी पवार तसेच सिंधुवैभव साहित्य समूहाच्या अध्यक्षा स्नेहा राणे-सरंगले यांनी सहभाग घेतला. कवी चव्हाण हे सोनवडे (घोटगे, ता. कुडाळ) येथील रहिवासी असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. हा त्यांचा दुसरा काव्य संग्रह आहे. भिकाजी चव्हाण हे संग्रहाचे प्रकाशक आहेत.
................
L76202
swt1715.jpg
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा
आज वर्धापनदिन सोहळा
कुडाळः बॅ. नाथ पै पुण्यतिथी व नाथ पै शिक्षण संस्थेचा वर्धापन सोहळा उद्या (ता. 18) आयोजित केला आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बॅ. नाथ पै कोकण डेव्हलपमेंटच्या संस्थापक अध्यक्षा अदिती पै, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, कमल परुळेकर, जयप्रकाश चमणकर, प्रदीप नेरुरकर, अशोक येजरे, जयराम डिगसकर व नाथ पै प्रेमी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये बॅ. नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तर सायंकाळी 6 वाजता स्नेहसंमेलनात संस्थेतील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक उमेश गाळवणकर व सहकाऱ्यांनी केले आहे.
...............