सरंबळ हायस्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरंबळ हायस्कूलचे यश
सरंबळ हायस्कूलचे यश

सरंबळ हायस्कूलचे यश

sakal_logo
By

76428
सरंबळ ः तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सरंबळ हायस्कूलने यश संपादन केले.

सरंबळ हायस्कूलचे यश
कुडाळ ः तालुकास्तरीय ५० व्या विज्ञान प्रदर्शनात सरंबळ हायस्कूलने यश मिळविले. विज्ञान प्रदर्शन श्री लिंगेश्वर विद्यालय, तुळसुली येथे झाले. या प्रदर्शनात सरंबळ इंग्लिश स्कूल, सरंबळ या प्रशालेच्या विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले. निबंध स्पर्धा मोठ्यात गटात (नववी ते दहावी) रिचा चव्हाण (दहा), प्रश्नमंजुषा स्पर्धेत हर्षा तोंडवळकर (नववी), साधी आसोलकर (दहावी) या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. लहान गटात (सहावी ते आठवी) प्रतिकृतीमध्ये भावेश रेडकर (सातवी) याच्या ‘अॅन्टी स्लिपींग अलार्म फॉर ड्राईव्हस’ या प्रतिकृतीचा द्वितीय क्रमांक आला. त्याची जिल्हास्तरावर निवड झाली. निबंध स्पर्धेत अनुष्का परब या विद्यार्थिनीने लहान गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिची जिल्हास्तरावर निवड झाली. प्रश्नमंजुषा स्पर्धेत लहान गटात अनुष्का परब व आर्या गावडे यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना शिक्षक भरत चौधरी, संदीप परब यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष रामचंद्र राऊत, सरचिटणीस राजेंद्र परब, शाखाध्यक्ष जयप्रकाश गावडे, शाखा चिटणीस प्रसाद साटम, मुख्याध्यापक अनिल होळकर आदींनी अभिनंदन केले.
.................
स्पर्धा परीक्षेबाबत २१ला मार्गदर्शन
सावंतवाडी ः दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गमार्फत न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल, हळदीचे नेरुर येथे शनिवारी (ता. २१) सकाळी नऊला एमपीएससी, यूपीएससी, तलाठी, ग्रामसेवक भरती व अन्य स्पर्धा परीक्षा विषयांवर प्रशालेच्या सर्व विद्यार्थी व या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या परिसरातील सर्व युवा वर्गासाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत प्रसिद्ध व्याख्याते तथा स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील मार्गदर्शन करतील. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी केले आहे. ही कार्यशाळा दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या कार्यशाळेस उपस्थित असणाऱ्यांना दुसऱ्या कार्यशाळेला प्रवेश दिला जाईल. कार्यशाळेला येणाऱ्यांनी वही व पेन घेऊन येणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधावा.