चांगले नागरिक घडविण्यासाठी महोत्सव आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांगले नागरिक घडविण्यासाठी महोत्सव आवश्यक
चांगले नागरिक घडविण्यासाठी महोत्सव आवश्यक

चांगले नागरिक घडविण्यासाठी महोत्सव आवश्यक

sakal_logo
By

rat१८p४८.jpg -
76561
जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवातील १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतील एक क्षण.

बालमहोत्सवातून चांगले नागरिक घडतील...

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश जोशी; चाचा नेहरु बाल महोत्सव सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी दि. १९ : मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी, त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी व देशातील चांगले नागरिक घडविण्यासाठी बालमहोत्सवांचा फायदा होईल, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. आर. जोशी यांनी केले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या निरीक्षणगृह बालगृह मुलांमुलींमध्ये एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रत्नागिरी येथे हा महोत्सव सुरू आहे. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बाल महोत्सव उद्या (ता.२०) पर्यंत सुरू राहील.

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले, मुख्य न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी आर. एम. चौधरे, न्यायदंडाधिकारी तथा अध्यक्ष बाल न्याय मंडळ, रत्नागिरीचे माणिकराव सातव, अध्यक्ष बाल कल्याण समिती संदेश शहाणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी ए. डी. भोसले, मातृमंदीर संस्थेचे हेगशेटये, बाल कल्याण समिती सदस्य शिरीष दामले, विनया घाग आदी उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले म्हणाले, याप्रकारे मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा व क्षेत्र निवडण्यासाठी मुलांनी फायदा घ्यावा. महोत्सवाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. बाल कल्याण समिती अध्यक्ष संदेश शहाणे यानी मनोगतामध्ये अशाप्रकारच्या स्पर्धेतून व्यक्तीगत कलागुणांना वाव मिळतो व सांघिक भावना निर्माण होते असे सांगितले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हयात कार्यरत असणाऱ्या निरीक्षणगृह बालगृह मुलांमुलींमध्ये एकमेकांविषयी बंधुभाव व सांघीक भावना निर्माण होण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन केल्याचे ते म्हणाले.

क्रीडा स्पर्धेचे उद्घघाटन...
प्रमुख मान्यंवरांच्या हस्ते १०० मीटर धावणे, मुले क्रीडा आदी क्रीडा प्रकारांचे उद्घाटनही करण्यात आले. त्याचबरोबर माहेर संस्थेमधील बिसना थापा हिची राज्यस्तरीय कब्बडी मध्ये निवड झाल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते गौरवही करण्यात आला.