क्रिकेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेट स्पर्धा
क्रिकेट स्पर्धा

क्रिकेट स्पर्धा

sakal_logo
By

rat१९११.txt

बातमी क्र..११ ( पान २)

rat१९p४.jpg ः
७६६८५
बुरंबाड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील उपविजेता एस. एस. भवानी चौक संघ.

बुरंबाडला क्रिकेट स्पर्धा

चिपळूण ः संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड साठे स्टॉप येथे बुरंबाड प्रीमियर लीग २०२३ अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेत पंचक्रोशीतील ८ क्रिकेटसंघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. दोन दिवसांच्या या स्पर्धांमध्ये बुरंबाड येथील आशिष लिंगायत यांच्या आमनायेश्वर क्रिकेट संघाने बाजी मारली. कासे येथील रोहन दवंडे यांच्या एस. एस. भवानी चौक क्रिकेट संघाने उपविजेतेपद पटकावले. दोन्ही विजेत्या संघाला रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. माजी सरपंच मनोज शिंदे यांनी आकर्षक चषक आणि सूरज ढाबा मालक दिलीप सावंत, सरपंच नम्रता कवळकर आणि सॉमील मालक परेश टाकळे यांनी रोख पारितोषिकसाठी सहकार्य केले. या स्पर्धेसाठी यश सुर्वे, शुभम कवळकर, स्वप्नील कुळ्ये, रितेश कवळकर, अक्षय कवळकर, सुमित गुरव, साईराज मोरे, संतोष भुवड आदींनी परिश्रम घेतले.
-----
स्वरूपानंद विद्यामंदिरचे तायक्वांदोमध्ये यश

पावस ः सातारा येथे आज झालेल्या तायक्वांदो या विभागीय स्पर्धेमध्ये पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरच्या तन्मय आपणकर आणि श्रेया गुर्जरपाध्ये यांनी कांस्यपदक मिळवले. त्याबद्दल विद्यार्थी-पालक व व मार्गदर्शक शिक्षक तसेच संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
--

rat१९p५.jpg ः
७६६८६
लांजा ः कोलेवाडी येथील सरपंच वैदेही बेंद्रे, उपसरपंच वैष्णवी सावंत, सदस्य साक्षी सावंत व अभिजित सावंत यांचे स्वागत करताना खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, उद्योजक अनिल पत्याने आणि पदाधिकारी.

कोलेवाडी सरपंच, उपसरपंच शिवसेनेत

लांजा ः लांजा तालुक्यातील कोलेवाडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आमदार राजन साळवी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. लांजा तालुक्यातील भांबेड जिल्हा परिषद गटामधील कोलेवाडी येथील सरपंच वैदेही बेंद्रे, उपसरपंच वैष्णवी सावंत, ग्रामपंचायत सदस्य साक्षी सावंत व अभिजित सावंत यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, उद्योजक अनिलशेठ पत्याणे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख पांडुरंग उपळकर, विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, चंद्रकांत मणचेकर, दिलीपभाऊ पळसुलेदेसाई व मान्यवर उपस्थित होते.
--

rat१९p६.jpg ः
७६६८७
संगमेश्वर ः जिल्हा कलाध्यापक संघाची नूतन कार्यकारिणी.

कलाध्यापक संघाच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार

संगमेश्वर ः रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघ आणि जिंदल फाउंडेशन आयोजित चित्रकला व हस्तकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बबन तिवडे (कोकण विभागीय सचिव), इम्तियाज शेख (अध्यक्ष), स्वरूपकुमार केळसकर (उपाध्यक्ष), राजन आयरे (सचिव), तुकाराम पाटील (खजिनदार), सुशीलकुमार कुंभार व उदय मांडे (स्पर्धाप्रमुख), जितेंद्र पराडकर (प्रसिद्धीप्रमुख), मुग्धा पाध्ये (महिला संघटक), तुकाराम दरवजकर व बीद्रीकोटी मठ (सल्लागार) तसेच सदस्य गजानन पांचाळ, मोहन बुरुटे, राकेश देवरूखकर, रामचंद्र धुमाळे, रियाज म्हैसाळे, प्रथमेश विचारे या रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघाच्या नूतन कार्यकारिणीचा उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा कला अध्यापक संघाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांनी कौतुक करून असेच विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे आवाहन संघटनेला केले.
--

rat१९p७ ः
७६६८८
गुहागर ः वेदांत गुरवला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करताना मान्यवर.

काव्यवाचन स्पर्धेत वेदांत गुरवचे यश

गुहागर ः मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात नुकतीच काव्यवाचन स्पर्धा मुख्याध्यापक एम. ए. थरकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या स्पर्धेत वेदांत गुरव या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक संपादन केला. हर्षदा पालकर हिने द्वितीय, मृण्मयी जाधव हिने तृतीय क्रमांक तसेच आसमा शेख व सिद्धी तांबे या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला. सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धा पार पडली. स्पर्धेतील बहुसंख्य सहभागी विद्यार्थ्यांनी कवी राजा बढे , बालकवी, सुरेश भट, गुरू ठाकूर, शांता शेळके आदी नामवंत कवी व कवयित्रींच्या कविता उत्तमप्रकारे सादर केल्या. विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे, नामवंत साहित्यिकांच्या कविता वाचून काव्यरचना, कवितेचा आशय, शब्दमांडणी आदी महत्त्वाच्या बाबी समजून घेतल्या पाहिजेत याबाबत मार्गदर्शन केले. भावार्थ ग्रंथालय चिपळूणतर्फे काव्यवाचन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे सुयश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, शालेयपयोगी वस्तू, भेटवस्तू व गुलाबपुष्प या स्वरूपात व उत्तेजनार्थ क्रमांक संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
--