कृषि, अन्नप्रकिया क्षेत्रामध्ये पेटंटला महत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषि, अन्नप्रकिया क्षेत्रामध्ये पेटंटला महत्व
कृषि, अन्नप्रकिया क्षेत्रामध्ये पेटंटला महत्व

कृषि, अन्नप्रकिया क्षेत्रामध्ये पेटंटला महत्व

sakal_logo
By

rat१९१४.txt

( पान २ साठी)

फोटो- rat१९p१.jpg -
७६६७४
प्राचार्य सुनितकुमार पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक खाडे यांचे स्वागत केले.


कृषि, अन्नप्रकिया क्षेत्रात पेटंटला महत्व

अतुल खाडे ; बौद्धिक मालमत्ता अधिकार सत्र

चिपळूण, ता. १९ ः कृषि व अन्नप्रकिया क्षेत्रामध्ये पेटंट या विषयाला अनन्यसाधारण महत्व आहे. या क्षेत्रांमध्ये संशोधनाला मोठा वाव आहे; पण काही तांत्रिक बाबींविषयी असणाऱ्या अज्ञानामुळे शेतकरी व प्रक्रिया उद्योजकांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना चालना मिळत नाही, असे प्रतिपादन केंद्रिय वाणिज्य व उद्योगविकास मंत्रालय, भारत सरकारचे पेटंट अधिकारी अतुल आसाराम खाडे यानी केले. शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते द हिवली येथे बौद्धिक मालमत्ता अधिकार सत्र उत्साहात पार पडले.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना खाडे यांनी यांनी पेटंट कसे रजिस्टर करावे, त्यासाठी लागणारे नियम व अटी, या क्षेत्रामधील असणाऱ्या संधी या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या सत्राचा एकूण २ हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यातून विद्यार्थ्यांच्या मनामधील सर्व शंकांचे निरसन करण्यात आले व त्यांना आपल्या संशोधकीय कामांच्या पेटंट रजिस्ट्रेशनसाठी प्रेरित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. रवींद्र माने, प्रा. सुशांत कदम व प्रा. प्रसाद साळुंके यांनी विशेष प्रयत्न केले.