वाशिष्ठीतील उर्वरित गाळ उपशावर लक्ष केंद्रीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशिष्ठीतील उर्वरित गाळ उपशावर लक्ष केंद्रीत
वाशिष्ठीतील उर्वरित गाळ उपशावर लक्ष केंद्रीत

वाशिष्ठीतील उर्वरित गाळ उपशावर लक्ष केंद्रीत

sakal_logo
By

rat१९५.txt

( पान ५ मेन)

rat१९p३.jpg ः
७६६८४
चिपळूण ः बचाव समितीने २६ जानेवारीला पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी घेतलेली अधिकाऱ्यांची बैठक.

वाशिष्ठीतील उर्वरित गाळ उपशावर लक्ष केंद्रित

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जाग; जागेची समस्या मार्गी

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः वाशिष्ठी नदीतील मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याच्या मागणीसाठी चिपळूण बचाव समितीने २६ जानेवारीपासून उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी जलसंपदासह संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तातडीने गाळासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहराच्या हद्दीत वाशिष्ठी नदीतील उर्वरित गाळ उपशाकडे प्रशासनाने आता लक्ष केंद्रित केले आहे.

चिपळूण शहर व परिसरात २२ जुलै २०२१ ला आलेल्या महापुराने न भुतो न भविष्यती असे नुकसान झाले. परिणामी चिपळूणवासीयांच्या आंदोलनामुळे मोठी यंत्रणा गाळ काढण्यासाठी कामाला लागली. तुलनेत यावर्षी पावसाळ्यानंतर गाळ काढण्यास गती मिळालेली नाही. यामुळे चिपळूण बचाव समितीने २६ जानेवारीपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी जलसंपदा विभाग, पाटबंधारे यांत्रिकी विभाग, नगरपालिका, वनविभाग आदींसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत गाळ उपशाचा आढावा घेण्यात आला. सध्या वाशिष्ठी नदीत जलसंपदा विभागाकडून ८ पोकलेन आणि २० डंपरद्वारे गाळ काढण्याचे काम सुरू आहे. गतवर्षी पेठमाप येथील साडेचार एकरच्या बेटातील गाळ काढण्यात आला तसेच उक्ताड बेटातील गाळही काढला. तेथे काही प्रमाणात काम बाकी आहे. बहादूरशेख नाका येथील सरकारी जागेतील बेटही काढण्यात आले आहे. वाशिष्ठी नदीत काही ठिकाणी खासगी बेटे असल्याने तेथील गाळ काढण्याची समस्या आहे. उक्ताड येथील एन्रॉन पुलाजवळील बेटामधील गाळ काढल्यास ३ पिलरला धोका उद्भवू शकतो, असा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. गोवळकोट येथील गाळ काढण्यासाठी बुमरची आवश्यकता भासणार आहे. गोवळकोट जॅकवेलजवळील गाळ मात्र येत्या काही दिवसात काढण्याची तयारी आहे. गतवर्षी गाळ टाकण्यासाठी जागेची अडचण निर्माण झाली होती; मात्र सध्या गाळ टाकण्यासाठी जागेची समस्या नसल्याचे प्रांताधिकारी पवार यांनी स्पष्ट केले. तसेच वाशिष्ठी नदीपात्रातील बेटांचे रेखांकन करण्याच्या सूचनाही प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नगरपालिका हद्दीत गाळ काढण्याचे काम सुरू राहील. त्यास पालिका प्रशासनाने सहकार्य करण्याची सूचना मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना केली.
...

नाम फाउंडेशनची तयारी
वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढण्यासाठी गतवर्षी नाम फाउंडेशनने यंत्रसामुग्री देत योगदान दिले होते. या वेळीही वाशिष्ठी नदीपात्रात उर्वरित टप्प्यातील गाळ काढण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात नाम फाउंडेशनचे समन्वयक समीर जानवलकर व देशपांडे यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
...