नेहरू सेंटरमध्‍ये ‘लगीन माझ्या संस्कृतीचं’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेहरू सेंटरमध्‍ये ‘लगीन माझ्या संस्कृतीचं’
नेहरू सेंटरमध्‍ये ‘लगीन माझ्या संस्कृतीचं’

नेहरू सेंटरमध्‍ये ‘लगीन माझ्या संस्कृतीचं’

sakal_logo
By

नेहरू सेंटरमध्‍ये ‘लगीन माझ्या संस्कृतीचं’
मुंबई ः विज्ञान, चित्रकला, ऐतिहासिक वस्तूचे जतन या गोष्टीसाठी नेहरू सेंटर जेवढे लोकप्रिय आहे तेवढेच ते सांस्कृतिक विचार आणि प्रचार करण्यासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. नेहरू सेंटरच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकनृत्यचा जागर मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. ‘लगीन माझ्या संस्कृतीचं’ हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी ६.३० वाजता वरळीच्या नेहरू सेंटर येथे होणार आहे. लावणी सम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांच्या स्मृतीस हा कार्यक्रम अर्पण केला जाणार आहे. प्रसिद्ध नर्तक, नृत्यदिग्दर्शक देवेंद्र शेलार हे या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. त्यांच्या नृत्य दिग्दर्शनात पन्नास कलाकारांचा ताफा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणार आहे. विनय अंगज, केतन कुंभार, संदेश मगर यांचे या कलाकृतीला साह्य लाभले आहे. २३ जानेवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून सभागृहाच्या तिकीट खिडकीवर विनामूल्य प्रवेशिका देण्यात येतील, असे आयोजकांनी सांगितले आहे.
---
विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर
चेंबूर ः दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा तयारी कशी करावी, याकरिता चेंबूर येथील जीवनज्योती फाऊंडेशनतर्फे इंग्लिश स्कूलमध्ये रविवारी (ता. २२) सकाळी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातील उपस्थित विद्यार्थ्यांना समुपदेशक आरती बनसोडे करणार आहेत. तरी या शिबिरास विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनिल ठाकूर यांनी केले आहे.

जान्हवी वाघमारेची सुवर्ण कामगिरी
चेंबूर ः पुणे शहरात पार पडलेल्‍या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंग क्रीडा प्रकारात चेंबूरमध्ये राहणारी जान्हवी वाघमारे हिने सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील स्पर्धक सहभागी झाले होते. विजेत्‍या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.