बांदा शहरातील धोकादायक वीजखांब बदलण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा शहरातील धोकादायक 
वीजखांब बदलण्याची मागणी
बांदा शहरातील धोकादायक वीजखांब बदलण्याची मागणी

बांदा शहरातील धोकादायक वीजखांब बदलण्याची मागणी

sakal_logo
By

76867
बांदा ः महावितरणचे सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना निवेदन देताना प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे आदी.

बांदा शहरातील धोकादायक
वीजखांब बदलण्याची मागणी
बांदा ः शहरातील प्रभाग तीनमध्ये ठिकठिकाणी जीर्ण झालेले वीजखांब धोकादायक बनले आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हे खांब तातडीने बदलावेत, अशी लेखी मागणी या प्रभागाचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर व रत्नाकर आगलावे यांनी केली. यासंदर्भात महावितरणचे बांदा सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, या प्रभागात निमजगा, गडगेवाडी येथे ठिकठिकाणी वीज खांब जुने असून ते जीर्ण झाले आहेत. या ठिकाणी दाटीवाटीने वस्ती असून खांब कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तत्काळ येथील वीज खांब बदलावेत. वाड्यात सर्वेक्षण करून लवकरात लवकर जीर्ण वीज खांब बदलण्यात येतील, असे आश्वासन अभियंता कोहळे यांनी यावेळी दिले.
---
76866
देवगड ः प्रभारी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याशी चर्चा करताना नगराध्यक्षा साक्षी प्रभू.

देवगडच्या प्रश्नांबाबत विचारविनिमय
देवगड ः येथील देवगड जामसंडे शहरातील विविध प्रश्‍नांच्या अनुषंगाने नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी प्रभारी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याशी चर्चा केली. सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा निर्मूलन, पथदीप आदींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. प्रभारी मुख्याधिकार्‍यांशी चर्चा करताना नगराध्यक्षा प्रभू यांच्यासह नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, संतोष तारी, विशाल मांजरेकर आदी उपस्थित होते. शहरातील विकासकामांबरोबरच अन्य विषयाच्या अनुषंगाने मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. दहिबांव अन्नपूर्णा नदीमध्ये पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या अनुषंगाने तेथे बंधारा बांधण्याबाबत चर्चा झाली. तसेच शहरातील निवासी संकुलाच्या सांडपाण्याच्या विषयावरही विचार विनिमय झाला.