गोविंदराव निकम जयंती महोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोविंदराव निकम जयंती महोत्सव उत्साहात
गोविंदराव निकम जयंती महोत्सव उत्साहात

गोविंदराव निकम जयंती महोत्सव उत्साहात

sakal_logo
By

ratchl२०१.jpg
७६९४७
चिपळूणः ओंकार भोजने यांचा सन्मान करताना उद्योजक प्रशांतशेठ निकम. शेजारी प्रकाश राजेशिर्के, अनिरुद्ध निकम, प्राचार्य सुमितकुमार पाटील, उमेश लकेश्री व मंगेश भोसले.
-------------
गोविंदराव निकम जयंती
महोत्सव उत्साहात
चिपळूण, ता. २०ः सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी स्व. गोविंदरावजी निकम यांचा ८८ वा जयंती महोत्सव सोहळा त्यांच्या स्मृतीगंध या समाधीस्थळी झाला. या सोहळ्याला सविता मालपेकर, विजय गोखले,संजय मोने, शर्मिष्ठा राऊत, ओंकार भोजने आदी दिग्गज कलाकार तर शरद तांदळे या प्रसिद्ध लेखकांनी उपस्थिती लावली.
या सर्व रंगकर्मींनी सह्याद्रीतील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी अविरत चालू आसलेल्या कार्याचा व परिपूर्णतेने सुरू असलेल्या विविध व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचा गौरव केला. आमदार शेखर निकम यांचे सर्व सामान्यांना बरोबर घेऊन सावर्डे नगरीत निर्माण केलेल्या शिक्षण पंढरीचे विशेष कौतुक केले.
महोत्सवात चिपळूणचे विनोदी कलाकार ओंकार भोजने यांनी विनोदी गीत गाऊन सर्वांची दाद मिळवली. सर्व दिग्गज मंडळींना जयंती महोत्सव सोहळ्याला येण्यासाठी आग्रह करणारे युवा नेते अनिरुद्ध निकम यांचे सर्वांनी विशेष कौतुक केले. कारण कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध दिग्गज मंडळींना ग्रामीण भागातील युवकांना भेटता आले पाहिजे. त्यांच्या कार्याची माहिती घेऊन कोकणचा युवकही या क्षेत्रात पुढे आला पाहिजे. या तळमळीने काम करणारे अनिरुद्ध निकम हे नेहमीच आमच्या बरोबरच सलोख्याचे संबंध ठेवून असतात. आमच्या वैयक्तिक जीवनातही पुढे येऊन सहकार्य करण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे त्यांच्या आग्रहाला आम्ही कधीही नाकारू शकत नाही. त्यांचे कार्य सामाजिक स्वरूपाचे असून या कार्यात आमचा हातभार लागला तर आम्हालाही समाधान आहे, असे मत या रंगकर्मींनी व्यक्त केले.