श्रमसंस्कार शिबिराचे हुमरमळा येथे उद्‌घाटन

श्रमसंस्कार शिबिराचे हुमरमळा येथे उद्‌घाटन

76953
हुमरमळा ः पणदूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी श्रमसंस्कार शिबिरात बोलताना हुमरमळा माजी सरपंच जान्हवी पालव.


श्रमसंस्कार शिबिराचे हुमरमळा येथे उद्‌घाटन

२४ पर्यंत आयोजन; विविध मान्यवरांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी, पणदूर तिठाचे कार्याध्यक्ष शशिकांत अणावकर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हुमरमळा-गावठणवाडी येथे बुधवार (ता.२१) पासून २४ पर्यंत सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले आहे. येथील माजी सभापती जयभारत पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत हुमरमळा माजी सरपंच सौ. जान्हवी पालव यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.
यावेळी दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, सचिव डॉ. अरुण गोडकर, सदस्य रविंद्र कांदळकर, प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे, हुमरमळा प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेश्मा सरंगले आदी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिंदे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत हे श्रमसंस्कार शिबीर हुमरमळा या गावी आयोजित करण्यास परवानगी देऊन सहकार्य केल्याबद्दल गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच सर्व ग्रामस्थांना धन्यवाद दिले. शिबिराचे प्रमुख उद्घाटक सरपंच पालव यांनी आपले मनोगत व्यक्त करत असून सलग दुसऱ्या वर्षी आपल्या गावात या शिबिराचे आयोजन होत असून पणदूर महाविद्यालयाचे विद्यार्थी अत्यंत शिस्तबद्धपणे श्रमदानाचे काम करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करत आहेत, असे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश जैतापकर, अकादमीचे सचिव डॉ. अरुण गोडकर, संचालक रविंद्र कांदळकर आणि व्यासपीठावरील इतर मान्यवरांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कालावधीत शिबिरामध्ये श्रमदानाबरोबरच रोज दुपारी ३ ते ५ या वेळेत बौद्धिक चर्चासत्र तसेच रात्री विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, शिबिराच्या उद्‍घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन एनएसएस विभागाच्या सदस्या प्रा. स्मिता परब यांनी केले. एनएसएस विभागप्रमुख प्रा. धोंडू गावडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
------------
विविध मान्यवरांची व्याख्याने
शिबिराच्या दरम्यान, ‘गाव गाता गजाली’ फेम अभिनेते नीलेश पवार, वृत्त निवेदक तथा अभिनेते निलेश जोशी यांचे ‘अभिनय’ विषयावर व्याख्यान होणार आहे. हुमरमळा ग्रामसेविका सौ. कांचन कदम या शासनाच्या विविध योजनांची माहिती देणार आहेत. एनएसएस जिल्हा समन्वयक प्रा. वसीम सय्यद हेही विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रीय सेवा योजने’विषयी माहितीपर व्याख्यान देणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com