गणेशगुळे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशगुळे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
गणेशगुळे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

गणेशगुळे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

sakal_logo
By

rat२०१३.txt

(टुडे पान २ साठी)

गणेशगुळ्यात माघी गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रम

पावस, ता. २० : गणेशगुळे येथील श्री गणेश मंदिरामध्ये माघी चतुर्थीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त स्थानिक व मुंबईकर मंडळांची नाटके रंगणार आहेत.
उत्सवानिमित्त २२ जानेवारीला सकाळी ६.३० वा. विधीवत गणेश पूजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, स. ८.०० वा. आरती, स. ९ ते १२.३० श्री गणेशयाग, दु. ३ ते ५ तीर्थप्रसाद, सायं ६.०० वा आरती, रात्री ९.३० वा. नाटक नाट्य नृत्य स्वर संध्या, सादरकर्ते अक्षय थिएटर्स गणेशगुळे. २३ जानेवारीला सकाळी ६.३० वा. गणेशपूजा, अभिषेक, स. ८.०० वा.आरती, दु. ३ ते ५ वा. जया बोरकर यांचे भजन, सायं. ६.०० वा रात्री ९.३० वा. दोन अंकी सामाजिक नाटक आणि दशरथ रांगणकर दिग्दर्शित मी माझ्या मुलांचा सादरकर्ते अजिंक्यतारा थिएटर्स, गणेशगुळे. २४ जानेवारीला सकाळी ६.३० वा. गणेश पुजन, मंत्रपुष्पांजली, आरती, दु. २ ते ५ वा. हळदीकुंकू, दु. ३ ते ५ वा. बुवा अशोक सुर्वे यांचे भजन, सायं. ६ वा. आरती, रात्री ९.३० वा. केदार शिंदे लिखित आणि प्रकाश विष्णू लाड दिग्दर्शित विनोदी नाटक तू तू मी मी, २५ ला सकाळी ६.३० वा. गणेशपूजन, अभिषेक, आरती, सकाली ९ वा. हृदय लाड यांच्याकडून सरबत वाटप, स. ११ ते १२.३० वा. जन्मोत्सवाचे कीर्तन, दुपारी १२.३० वा. पालखी मिरवणूक, १२ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी १ ते ३ वा. भजन, दुपारी ३.३० ते ५ भजन, सायं ६ वा. आरती, रात्री ९.३० वा. नाटक वसंत कानेटकर लिखित व प्रकाश पेटकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले. उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद तोडणकर, कार्याध्यक्ष विक्रांत रांगणकर, उपाध्यक्ष प्रज्योत गुळेकर, खजिनदार संतोष गुळेकर, सचिव प्रथमेश रांगणकर, सहसचिव अभिजित नागवेकर आणि सर्व सदस्यांनी केले आहे.