
उर्दू शिक्षक संघटना मेळावा नांदगाव येथे उत्साहात
77020
नांदगाव ः उर्दू शिक्षक संघटना सिंधुदुर्ग वार्षिक मेळाव्यात मार्गदर्शन करताना मान्यवर.
उर्दू शिक्षक संघटना मेळावा
नांदगाव येथे उत्साहात
नांदगाव, ता. २० ः महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना सिंधुदुर्गचा वार्षिक मेळावा नांदगाव उर्दू शाळा येथे उत्साहात झाला. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना ही राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या न्याय, हक्क, सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी राज्य स्तरावर प्रतिनिधित्व करणारी एकमेव संघटना आहे. या संघटनेचा वार्षिक मेळावा नांदगाव उर्दू शाळा येथे आयोजित केला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य सचिव ताजुद्दिन परकार, उपाध्यक्ष रिजवान शेख, कोकण विभाग सचिव शाहनवाज लोरे, रायगड जिल्हाध्यक्ष अखलाक गोडमे, रत्नागिरी सचिव रियासत नाईक, राज्य संघटक सियाकत राऊत, रायगड सचिव राज अहमद, कोल्हापूर कार्याध्यक्ष शाहनूर, शौकत ऐनरकर, राज्य संघटक हाजी सुलेमान बेग आदी उपस्थित होते. यावेळी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील उर्दू शिक्षक रिक्त पदे तात्काळ भरणे, आंतर जिल्हा बदली झालेल्यांना कार्यमुक्त करणे, अल्पसंख्याक मुलांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देणे, जुनी पेन्शन तसेच मुस्लिम राज्यातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व गुणवत्तापुर्ण शिक्षण देऊन पूर्ण समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी काय करता येईल, यावरही चर्चा झाली. स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी प्रयत्न तर मुस्लिम समाजाच्या विकासासाठी उर्दू शिक्षकांची भूमिका यावर चर्चा करण्यात आली. सिराज सोलकरतर यांनी प्रास्ताविक केले. सईद बटवाले यांनी आभार मानले.