‘सकाळ’च्या कणकवली कार्यालयाचा आज वर्धापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सकाळ’च्या कणकवली
कार्यालयाचा आज वर्धापन
‘सकाळ’च्या कणकवली कार्यालयाचा आज वर्धापन

‘सकाळ’च्या कणकवली कार्यालयाचा आज वर्धापन

sakal_logo
By

(कव्हर पेज फोटो)

‘सकाळ’च्या कणकवली
कार्यालयाचा आज वर्धापन

स्नेहमेळाव्यास उपस्थितीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २० ः ‘सकाळ’च्या येथील विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन उद्या (ता. २१) साजरा होणार आहे. या निमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे.
‘सकाळ’ गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग आवृत्तीच्या माध्यमातून जिल्ह्यात सकारात्मक आणि विकासात्मक पत्रकारिता करत आहे. अन्याय, अत्याचार, सामाजिक प्रश्न आदी संदर्भात परखड भूमिका घेण्याबरोबरच शाश्वत विकास कसा असायला हवा, याबाबत ठोस भूमिका मांडणारी पत्रकारिता करत ‘सकाळ’च्या सिंधुदुर्ग आवृत्तीने एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ‘सकाळ’च्या येथील कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त वास्तू ही पुरवणी प्रसिद्ध करत आहोत. यात घर बांधताना काय काळजी घ्यायला हवी?, घर कसे असावे, याबरोबरच वास्तू या विषयाशी संबंधित अभ्यासपूर्ण मांडणी असलेले लेख समाविष्ट केले आहेत. या पुरवणीचा औपचारिक प्रकाशन सोहळाही उद्या स्नेहमेळाव्या दरम्यान होणार आहे. हा स्नेहमेळावा सायंकाळी पाच ते रात्री आठ दरम्यान ‘सकाळ’च्या कणकवली येथील मुंबई-गोवा महामार्गाजवळील गांगोमंदिर समोरील चिंतामणी प्लाझामधील कार्यालयात होणार आहे. ‘सकाळ’चे वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, विक्रेते, जिल्ह्यातील नागरिक आदींनी यात सहभागी होऊन ‘सकाळ’शी असलेले नाते अधिक वृद्धिंगत करावे, असे आवाहन ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे करण्यात आले आहे.