सदर ः लोकजीवनातील म्हसोबाचे स्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ः लोकजीवनातील म्हसोबाचे स्थान
सदर ः लोकजीवनातील म्हसोबाचे स्थान

सदर ः लोकजीवनातील म्हसोबाचे स्थान

sakal_logo
By

rat२१३.txt

( पान ६ )

(८ जानेवारी पान सहा)

आख्यायिकांचे आख्यान ः लोगो

rat२१p१.jpg ः
७७०९७
धनंजय मराठे.

rat२१p११.jpg ः
७७०९९
या प्रकारे प्रतिकात्मक अवयव म्हसोबाला वाहतात.

प्रत्येक गावात एकतरी ग्रामदैवत असते. असेच राजापूरच्या शहराच्या वेशीवर एक म्हसोबा आणी इटलाई देवस्थान आहे. आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या एका सात्विण वृक्षाखाली आम्ही हे देवस्थान पाहत आलोय; पण गेल्या दोन वर्षांपूर्वी हे झाड पडले. आता तेथे अर्जुन वृक्षाचे बऱ्यापैकी उंचीचे झाड आहे. एका कंबरभर उंचीच्या दगडी बांधकामावर या दोन्ही देवतांचे शिळारूपात देवस्थान आहे. तसे राजापूरपासून जवळच शहरातील वरचीपेठ भागातील मारूती मंदिराच्या पुढील बाजूला अर्जुना नदीकिनारी हे देवस्थान आहे. ही राजापूरची एका बाजूची वेस म्हणता येईल. पूर्वी गंगेवर जायचं म्हटले की, पहिला टप्पा म्हसोबा. त्या ठिकाणी क्षणभर विश्रांती घेऊन अर्जुना नदीपलीकडे उन्हाळे या ठिकाणच्या सदोदित गोमुखातून वाहत असणाऱ्या गरम पाण्याच्या ठिकाणी जाऊन आंघोळ नाही तर पाणी पिऊन पुढे गंगेची पाखाडी चढायची. मन प्रसन्न होते.

- धनंजय मराठे, राजापूर

manojmarathe४@gmail.com
----

लोकजीवनातील म्हसोबाचे स्थान

म्हसोबा हे फार पुरातन असे देवस्थान. अनादी काळापासून याची महती ऐकायला मिळते. काही प्रथा परंपरासुद्धा या ठिकाणी पाहायला, ऐकायलाही मिळतात. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीत पूर्वी मामलेदार कार्यालय होते. या वखारीच्या नदीकडील बाजूला होळीचा मांड आहे. या मांडाजवळ आपट्याच्या पानांचा मोठा भारा दसऱ्याच्या सीमोल्लंघनासाठी सोने लूटकरिता ठेवण्यात येत असे. या दसऱ्याच्या दिवशी मामलेदार साहेब तलवारीने भाऱ्याचा बंद कापात असत. एकप्रकारे सीमोल्लंघन सोने लुटायच्या कार्यक्रमाची सुरवात होत असे. उपस्थित लोक हे आपटारूपी सोनेलूट करत प्रथम कचेरीच्या आवारातील महापुरुषाला हे सोने अर्पण करण्याची प्रथा होती.
या कचेरीच्या आवारातील महापुरुषाशेजारीच एक रेडा बांधलेला असे. त्यालाही एक आपट्याची फांदी खाऊ घालत असत. त्या रेड्याला गुलाल फासून जास्वंदीच्या फुलांच्या माळांनी सजवत आणि सूर्यास्ताच्या सुमाराला ढोलाच्या गजरात त्याची बाजारपेठ वरचीपेठ मार्गे मिरवणूक काढत रात्री उशिरा म्हसोबापर्यंत ही मिरवणूक जात असे. नंतर बहुदा त्याचा बळी दिला जात असे. १९४४/४५ च्या दरम्याने बळी हा अघोरी प्रकार कायद्याने बंद झाला. म्हसोबालासुद्धा बळी प्रकार कदाचित मान्यही नसावा. म्हसोबा आजही त्याच्या भक्तांच्या हाकेला धावून येतो. भक्तांच्या नवसाला पावतो. त्यांच्या व्याधी बऱ्या करतो हे मात्र खरं! म्हसोबा हे दैवत आजही लोकप्रिय आहे. याच्या अनोख्या प्रथेची खासियत म्हणजे माणसे, जनावरे यांच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाला दुखापत, इजा झाली असेल तर म्हसोबला घरातूनच माझा दुखापत झालेला अवयव बरा होऊ दे! बरा झाल्यावर तो अवयव तुझ्या पायाशी आणून ठेवेन. अशा पद्धतीने नवस आजही बोलला जातो तसेच अंडी न देणारी कोंबडी अंडी द्यायला लागू देत, असाही नवस बोलण्याची प्रथाही आहे; पण सत्यवचनाला जागला तर तो माणूस कसला? नवसाला पावलेल्या म्हसोबाला सुतारांकडून प्रतिकात्मक लाकडी अवयव बनवून तो म्हसोबला अर्पण करत माणूस वचनपूर्ती करतो तसेच कोंबडी अंडी देऊ लागली की, त्याच्यासमोर अंडे ठेवून त्याला बारीक भोक पडून त्यात काडी घालून त्यातील काडीला लागेल इतकाच बलकाचा भाग त्याच्या चरणी अर्पण करून नवस फेडलारे बाबा म्हणत बाकी अंडे घरला घेऊन जाणाऱ्या त्याच्या भक्तांवरही म्हसोबा कृपादृष्टी ठेवतो, असेच म्हणावे लागेल.
आजही म्हसोबाला गेलात की, त्याच्याभोवती प्रतिकात्मक लाकडी जनावरांचे अवयव, मानवी अवयव पाहायला मिळतात आणि आपल्या भागातील सुतारकाम करणाऱ्यांची कलाकारी पाहात हा म्हसोबा नवसाला पावतो याची खात्री पटते. असे प्रतिकात्मक अवयव वाहण्याची पद्धत कोकणात अनेक ठिकाणी आढळते.

(लेखक लोकजीवन अन् लोकरितीचे अभ्यासक आहेत.)
---