प्रा. दंडवते जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रम

प्रा. दंडवते जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रम

77301
कुडाळ ः बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे प्रा. मधु दंडवते यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (छायाचित्र ः अजय सावंत)

प्रा. दंडवते जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रम

उमेश गाळवणकर ः कुडाळ, सावंतवाडी रेल्वेस्थानकांत अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ ः प्रा. मधू दंडवते यांच्या कार्याची ओळख सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी २०२३-२४ हे जन्मशताब्दी वर्ष विविध उपक्रमांद्वारे साजरे करण्यात येणार असल्याची माहिती बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी दिली.
प्रा. मधू दंडवते यांचे मानसपुत्र म्हणून कार्यरत असलेले नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी कुडाळ, सावंतवाडी रेल्वेस्थानक आवारात व बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये असलेल्या मधू दंडवते यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षीही कुडाळ व सावंतवाडी रेल्वेस्थानकांच्या आवारात प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रा. अरुण मर्गज यांनी, निश्चयी, निर्लोभी, तत्त्वनिष्ठ आणि सदाचारणी राजकारणी म्हणजे प्रा. मधू दंडवते. सत्तेची कोणत्याही प्रकारची हाव न बाळगतात समाजासाठी आणि राष्ट्रासाठी काम करत राहणे हा त्यांचा स्वभावधर्म होता. माजी रेल्वेमंत्री, माजी अर्थमंत्री असलेले प्रा. दंडवते यांच्या कार्याचे स्मारक कोकण रेल्वेच्या रुपाने अजरामर राहील, असे सांगत कोकण रेल्वेचे शिल्पकार व कोकणी जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेले प्रा. दंडवते यांच्या शुद्ध व तत्वनिष्ठ चारित्र्याचा उपस्थितांना परिचय करून दिला. सावंतवाडी रेल्वेस्थानक येथील कार्यक्रमात प्रा. दंडवते यांना श्रद्धांजली अर्पण करताना स्टेशन मास्तर शैलेंद्र कर्पे, मडुरा स्टेशन मास्तर कृष्णकांत परब, वेंगुर्लेचे माजी सभापती सुनील मोरजकर, रंजना ओटवणेकर, शिवप्रसाद पेडणेकर, दत्ता मातोंडकर, वरळी हॉस्पिटलच्या स्टाफ नर्स हवाबी शेख, अंकिता पेडणेकर तसेच बी.एड् कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, प्रा. योगिता शिरसाट, प्रसाद कानडे, वैष्णवी सावंत, आकांक्षा सावंत, सुविधा जाधव आदी उपस्थित होते. तर कुडाळ येथे अरुण मर्गज, प्रा. अनुष्का रेवंडकर, सेंट्रल स्कूलच्या विभा वझे, अश्विनी परब, स्टेशन मास्तर प्रज्ञा नाईक, रेल्वे कर्मचारी भरत नाईक आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com