रत्नागिरी-कवी केशवसुत स्मारक मराठी साहित्यासाठी अभिमानास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-कवी केशवसुत स्मारक मराठी साहित्यासाठी अभिमानास्पद
रत्नागिरी-कवी केशवसुत स्मारक मराठी साहित्यासाठी अभिमानास्पद

रत्नागिरी-कवी केशवसुत स्मारक मराठी साहित्यासाठी अभिमानास्पद

sakal_logo
By

कवी केशवसुत स्मारक मराठी
साहित्यासाठी अभिमानास्पद
भारत सासणे ; मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकाला सदिच्छा भेट
रत्नागिरी, ता. २२ः मराठी साहित्यात कवितांच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थिती आणि व्यवस्थेवर कवितांच्याद्वारे केलेले लेखन केले. त्यांच्या त्या स्मृतींना कोकण मराठी साहित्य परिषदेने उभारलेले स्मारक हे अत्यंत प्रभावी असून म्हणूनच कवी केशवसुत स्मारक हे मराठी साहित्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, असे मत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केले.
मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सर्वप्रथम भारत सासणे यांनी संपूर्ण कवी केशवसुत स्मारकाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यानंतर प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचा सपत्नीक सन्मान कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी केला. प्रास्ताविक कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी कोमसापच्या वाटचालीचा आढावा घेताना संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या लेखणीचे कौतुक करत त्यांना धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रमाचे निवेदन माधव अंकलगे यांनी केले.
कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रसार माध्यम समिती प्रमुख जयु भाटकर, सौ. सासणे, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या अध्यक्षा नलिनी खेर, मालगुंड शाखेचे कार्याध्यक्ष शुभदा मुळ्ये, कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अरुण मोर्ये, मालगुंड शाखेचे सचिव विलास राणे, रामानंद लिमये आदी उपस्थित होते.