वेताळबांबर्डे येथे वटवृक्षाला 
आग; मोठी दुर्घटना टळली

वेताळबांबर्डे येथे वटवृक्षाला आग; मोठी दुर्घटना टळली

77537
वेताळ बांबर्डे ः तिठा येथे वटवृक्षात लागलेली आग विझविताना स्थानिक.

वेताळबांबर्डे येथे वटवृक्षाला
आग; मोठी दुर्घटना टळली
कुडाळ ः वेताळबांबर्डे तिठा (ता.कुडाळ) येथे मोठ्या वटवृक्षाला आज सकाळी आग लागली. याची माहिती येथील स्थानिक नागरिक गुणेश बांबर्डेकर आणि नीलेश बांबर्डेकर यांनी येथील नगरपंचायतीला दिली. यावेळी नगरपंचायतीचे कर्मचारी अग्निशमन बंबासहित तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे वडाच्या झाडाला लागलेली आग काही मिनिटात विझविण्यात यश मिळविले. यावेळी कुडाळ नगरपंचायतचे कर्मचारी संजय टेंबुलकर, गजानन पेडणेकर, गोट्या कोरगावकर, सतीश जाधव तर स्थानिक नागरिक गुणेश बांबर्डेकर, निलेश बांबर्डेकर, शुभम बांबर्डेकर, विलास बांबर्डेकर यांनी वडाच्या झाडाला लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आग लागल्या भागात लोकवस्ती तसेच शेती असून येथील नागरिक आणि कुडाळ नगरपंचायतीच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
---------
सावंतवाडीत ‘कोरे’चा वर्धापन
सावंतवा़डी ः कोकण रेल्वे २० जानेवारी १९९७ पासून रत्नागिरी ते सावंतवाडी विभागात सुरू झाली. या अनुषंगाने २५व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी रेल्वेस्थानक येथे २६ व २७ ला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २६ ला सकाळी नऊला धार्मिक कार्यक्रम, दुपारी एक ते तीनपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ८ पर्यंत सिद्धेश्वर उद्दिनाथ भजन मंडळ, तळवडे यांचे भजन, रात्री नऊला श्री बोर्डेकर दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग यांचा ‘महाकाल’ नाट्यप्रयोग, २७ ला नऊला हनुमान भजन मंडळ, वर्दे कुडाळचे बुवा विजय गुंडू सावंत विरुद्ध लिंगडाळ भजन मंडळ देवगडचे बुवा संदीप लोके यांचा डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे कर्मचारी वृंदाने केले आहे.
---------
तेंडोली-तळेवाडीत विविध कार्यक्रम
कुडाळ ः तेंडोली-तळेवाडी येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त २४ व २५ ला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ला रात्री ८ वाजता नवोदित दशावतार (माड्याचीवाडी) मंडळाचे नाटक, २५ ला सकाळी ९ वाजता गणेश पूजन, आरती, ११ वाजता धार्मिक विधी, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री साडेआठला भजने, साडेदहाला महापुरुष दशावतार मंडळ सावंतवाडीचे नाटक होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन गणेश कृपा मित्रमंडळ तेंडोली-तळेवाडी यांनी केले आहे.
---------------
दोडामार्गात फेब्रुवारीत लोकअदालत
दोडामार्ग ः दिवाणी न्यायालय दोडामार्ग येथे ११ फेब्रुवारीला सकाळी १०:३० वाजता राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली आहे. ज्या पक्षकारांनी प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वीज वितरण कंपनी, दूरसंचार निगम, वित्तीय संस्था, बँक तसेच ग्रामपंचायती यांनी आपल्याकडील जास्तीत जास्त वादपूर्व प्रकरणे दाखल करून ही प्रकरणे मिटविण्यात यावीत. त्यासाठी संबंधितांनी येथील दिवाणी न्यायालयात संपर्क साधावा, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (क स्तर) वाय. पी. बावकर यांनी केले आहे.
---------------
बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यताचे यश
कुडाळ ः मुंबई येथे झालेल्या डीसीए चषक या बुद्धिबळ स्पर्धेत सात वर्षांखालील मुलींच्या गटात मालवण-कट्टा येथील भाग्यता साळकर या विद्यार्थिनीने दुसरा क्रमांक प्राप्त केला. तसेच ठाणे येथे झालेल्या ठाणे यंगमास्टर्स या बुद्धिबळ स्पर्धेत सात वर्षांखालील गटात दुसरा, तर आठ वर्षांखालील गटात पाचवा क्रमांक मिळविला. तिला या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू व ''फिडे'' पंच प्रणव टंगसाळे यांचे मार्गदर्शन लाभले. तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
-----------------
मालवणात आज पाककला स्पर्धा
मालवण ः बाळासाहेबांची शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ ला दुपारी ३ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे भारती घारकर, नीलम शिंदे, कविता मोंडकर यांच्याकडे नोंदवावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com