रत्नागिरी-रत्नागिरीत 40 मुलांवर मोफत शस्त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रत्नागिरीत 40 मुलांवर मोफत शस्त्रक्रिया
रत्नागिरी-रत्नागिरीत 40 मुलांवर मोफत शस्त्रक्रिया

रत्नागिरी-रत्नागिरीत 40 मुलांवर मोफत शस्त्रक्रिया

sakal_logo
By

रत्नागिरीत ४० मुलांवर
मोफत शस्त्रक्रिया
उद्योगमंत्री सामंत वैद्यकीय मदत कक्ष ; सायन हॉस्पिटलची मदत
रत्नागिरी, ता. २२ः तीन महिन्यांचे बाळ ते १४ वर्षे वयोगटातील तब्बल ४० मुलांवर हर्निया, अपेंडीक्स, जननेंद्रीयांचे आजारांवर रत्नागिरीत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जिल्हा शासकीय रुग्णालय आणि सायन हॉस्पिटलच्या संयुक्त उपक्रमातून हा शस्त्रक्रिया झाल्या. चार मुलांवर मुंबई येथे शस्त्रक्रिया होणार आहेत.
सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींवर मुंबईसह अन्य तज्ज्ञ डॉक्टरांनी रत्नागिरीत येऊन उपचार केल्यास येथील जनतेला त्याचा मोठा फायदा होईल अशा भावना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या.
जिल्हा शासकीय रुग्णालयात २० जानेवारीपासून तीन दिवस एक ते १८ वयोगटातील बालकांसाठी हर्निया, अपेंडीक्स, जननेंद्रीयांचे आजार व हायड्रोसील याबाबतची शस्त्रक्रियांचे आयोजन सायन हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने करण्यात आले होते. तीन दिवसात सायन हॉस्पिटलच्या डॉ. पारस कोठारी, डॉ. शहाजी देशमुख, डॉ. मैत्रेयी सावे, डॉ. आकृती, डॉ. श्वेता व डॉ. प्रियंका व कर्मचारी यांनी केल्या. यामध्ये एका तीन महिन्याच्या बालकावरही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. चारजणांवर मुंबईत शस्त्रक्रिया लवकरच मोफत होणार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनीही या शिबिरासाठी सोयीसुविधा सायन हॉस्पिटलच्या पथकाला उपलब्ध करून दिल्या होत्या. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या पथकानेही या शस्त्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. सामंत वैद्यकीय मदत कक्षाचे महेश सामंत व सागर भिंगारे यांनी शस्त्रक्रिया व तपासणीसाठी आलेली मुले व त्यांच्या पालकांना सोयीसुविधांचा अभाव राहणार नाही याची दक्षता घेतली. या वैद्यकीय पथकाची पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले.