सकाळ चित्रकला पान एक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ चित्रकला पान एक
सकाळ चित्रकला पान एक

सकाळ चित्रकला पान एक

sakal_logo
By

७७२६६

लोगो- आजच्या पान एकवरून
...........

रंगरेषांच्या दुनियेत रमला बालचमू!

कोल्हापूर आवृत्ती क्षेत्रात ९६ हजारांवर स्पर्धकांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः सकाळ चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्ती क्षेत्रातील ९६ हजार २९६ स्पर्धकांनी आज रंग-रेषांच्या दुनियेची अनोखी सफर केली. बालमित्रांचे भावविश्व यानिमित्ताने कागदावर उमटलेच. त्याशिवाय पालक आणि आजी-आजोबांनीही यंदाच्या रंगोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सकाळ मराठी डिजि माध्यम या स्पर्धेचे शैक्षणिक पार्टनर, कोलगेट आणि रिलायन्स स्मार्ट बझार सहप्रायोजक, तर संजय घोडावत युनिव्हर्सिटी, वारणा समूह स्थानिक प्रायोजक होते.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील १८१, सांगली शहर आणि जिल्ह्यातील १०१, सिंधुदुर्गातील २६, रत्नागिरीतील ३० आणि बेळगावातील ४० अशा एकूण ३७८ केंद्रांवर ही स्पर्धा झाली. पाचवी आणि सातवीच्या ‘क’ गटात सर्वाधिक स्पर्धक सहभागी झाले. पहिली व दुसरीच्या गटात अठरा हजार ४२५, तिसरी व चौथीच्या गटात वीस हजार ५०८, पाचवी ते सातवीच्या गटात ३३ हजार ३९, आठवी ते दहावीच्या गटात २३ हजार ९४६ इतके विद्यार्थी सहभागी झाले. महाविद्यालयीन तरुणाई ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून स्पर्धेत सहभागी झाले. एकूणच या स्पर्धेच्या निमित्ताने तीन पिढ्या एकवटल्या आणि त्यांनी आजच्या रविवारच्या सुट्टीची सुरुवातच या अनोख्या चित्रांगणाच्या साक्षीने केली.