देवगड़ात गोव्यातील पर्ससीन पकडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड़ात गोव्यातील पर्ससीन पकडली
देवगड़ात गोव्यातील पर्ससीन पकडली

देवगड़ात गोव्यातील पर्ससीन पकडली

sakal_logo
By

77598
देवगड ः येथील मत्स्यव्यवसाय विभागाने पकडलेली पर्ससीन नौका.

गोव्यातील पर्ससीन नौका
देवगडमध्ये पकडली

‘मत्स्यची’ कारवाई; जलधी क्षेत्रात मच्छीमारीचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः राज्याच्या जलधी क्षेत्रात पर्ससीन मच्छीमारीस प्रतिबंध असताना विनापरवाना संभाव्य पर्ससीन मासेमारी करण्याच्या उद्देशाने समुद्रात उभ्या असलेल्या गोवा येथील एका मच्छीमारी नौकेला मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने पकडले. ही कारवाई काल (ता. २१) दुपारच्या सुमारास करण्यात आली. संबंधित मच्छीमारी नौकेला येथील बंदरात आणून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.
राज्याच्या जलदी क्षेत्रात पर्ससीन मासेमारीला प्रतिबंध आहे. याच दरम्यान मत्स्य व्यवसाय विभागाचे पथक समुद्रात गस्त घालीत असताना एक पर्ससीन मच्छीमारी ट्रॉलर जाळ्याद्वारे मच्छिमारी करण्याच्या उद्देशाने देवगड भागातील समुद्रात उभा होता. संबंधित ट्रॉलर पर्ससीन मासेमारी करीत असल्याच्या संशयावरून त्याला पकडण्यात आले. संबंधित नौकेची पाहणी केली असता नौकेवर पर्ससीन जाळे व जनरेटर सापडला. त्यामुळे संबंधित मच्छीमारी नौका पुढील कार्यवाहीसाठी येथील बंदरात आणण्यात आली. मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्यासह सागर सुरक्षा रक्षक धाकोजी खवळे, संतोष ठुकरुल, अमित बांदकर, योगेश फाटक, लक्ष्मण लोके आदींचा यामध्ये समावेश होता.
.................