कणकवलीत २८ ला राष्ट्रीय प्रवासी दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत २८ ला
राष्ट्रीय प्रवासी दिन
कणकवलीत २८ ला राष्ट्रीय प्रवासी दिन

कणकवलीत २८ ला राष्ट्रीय प्रवासी दिन

sakal_logo
By

कणकवलीत २८ ला
राष्ट्रीय प्रवासी दिन
कणकवली ः तालुका प्रवासी संघातर्फे २८ ला सकाळी दहाला नगर वाचनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात राष्ट्रीय प्रवासी दिन साजरा करण्यात येणार आहे. उपक्रमात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे असणार आहेत. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, पोलिस निरीक्षक डॉ. संदीप साळुंखे, अनिल जाधव, डॉ. दीपक अंधारी, भालचंद्र मराठे आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष रमेश जोगळे यांनी केले आहे.
.....................
पिंगुळीत फेब्रुवारीत
‘अमृत मोहिनी’
दाडामार्ग ः शहरातील संपूर्ण महिला कलाकार असलेले ‘अमृत मोहिनी’ हे पौराणिक संगीत नाटक २ फेब्रुवारीला पिंगुळी येथे सादर केले जाणार आहे. पिंगुळी येथे प. पू. राऊळ महाराज यांचा २९ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत ३८ वा पुण्यतिथी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याचे औचित्य साधून पिंगुळी येथे हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. दोडामार्गातील श्री देवी सातेरी-पिंपळेश्वर महिला मंडळातील महिला कलाकार ही नाट्यकृती सादर करणार आहेत. यशवंत रांजणकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन गोकुळदास तोरस्कर यांनी केले आहे.
--------------
‘रोटरी’तर्फे माफक
दरात श्रवणयंत्रे
कणकवली ः रोटरी क्लब सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व यांच्यातर्फे तालुक्यातील कर्णबधिर व्यक्तींसाठी श्रवणयंत्रे माफक किंमतीत देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात ज्येष्ठ नागरिक, दारिद्र्य रेषेखालील लोक, दिव्यांग, अपंगांना प्राधान्य देण्यात येणार आहे. श्रवणयंत्रे वाटपाचा सावंतवाडीतील कार्यक्रम गुरुवारी (ता. २६) सकाळी दहा ते साडेबारा दरम्यान सालईवाडा येथील रोटरी क्लब हाऊस येथे होईल. तर दुपारी अडीच ते साडेचार दरम्यान कणकवली येथील डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हॉस्पिटलमध्ये होईल.
--
धामापूरमध्ये उद्या
माघी गणेश जयंती
मालवण ः धामापूर सड्यावरील देवस्थान श्री मोरेश्वर गणपती मंदिर येथे बुधवारी (ता. २५) ला माघी गणेश जयंती उत्सव होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी सहाला श्री मोरेश्वर अभिषेक, सकाळी दहाला श्री मोरेश्‍वर गणपती आरती, दुपारी एकला महाप्रसाद, दुपारी तीनला हळदीकुंकू कार्यक्रम, दुपारी चारला स्थानिकांची भजने, सायंकाळी सहाला सत्कार, रात्री सातला हेळेकर दशावतार नाट्यमंडळ, सावंतवाडी-कारिवडे यांचे दशावतारी नाटक तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
-----------------
वायंगणीत माघी
गणेश जयंती
वेंगुर्ले ः वायंगणी-सुरंगपाणी येथील श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त बुधवारी (ता. २५) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे व्यवस्थापक नाईक कुटुंब यांनी केले आहे. सकाळी आठ ते दहापर्यंत श्री अथर्वशीर्ष आवर्तने, दुपारी एकरा ते एकपर्यंत श्रींचे जन्म सोहळा कीर्तन, दुपारी एकला पालखी प्रदक्षिणा, दुपारी दीडला महाप्रसाद, सायंकाळी सहाला भजन, रात्री दहाला पालखी प्रदक्षिणा होईल.