जिल्ह्यात बंधाऱ्यांची ३७.४२ टक्के उद्दिष्टपूर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात बंधाऱ्यांची ३७.४२ टक्के उद्दिष्टपूर्ती
जिल्ह्यात बंधाऱ्यांची ३७.४२ टक्के उद्दिष्टपूर्ती

जिल्ह्यात बंधाऱ्यांची ३७.४२ टक्के उद्दिष्टपूर्ती

sakal_logo
By

90876

जिल्ह्यात बंधाऱ्यांची ३७.४२ टक्के उद्दिष्टपूर्ती

जल संधारण विभाग; कुडाळ तालुका १०५ टक्क्यांसह आघाडीवर

सिंधुदुर्गनगरी, ता. २३ ः जिल्ह्यात उन्हाळ्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने निश्चित केलेल्या ६,२०० कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत २३२० बंधारे बांधून ३७.४२ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तर कुडाळ तालुक्याने आपले उद्दिष्ट १०५ टक्के पूर्ण करून कामात आघाडी घेतल्याची माहिती जिल्हा जलसंधारण विभागाकडून देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे दरवर्षी जिल्ह्यात कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार यावर्षीही जिल्ह्यात ६,२०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गतवर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने कच्चे व वनराई बंधाऱ्याचे निश्चित केलेले उद्दिष्ट ७८ टक्के पूर्ण केले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोठेही पाणीटंचाई जाणली नाही.
---
चार्ट
तालुका *उद्धिष्ट *कच्चे *वनराई*एकूण
कणकवली *१००० *१३१ *४५*१७६
कुडाळ*१०००*८१६*२३४*१०५०
दोडामार्ग*४००*७*१३*२०
वेंगुर्ले*५००*१६*६७*८३
मालवण*१०००*४१*१७९*२२०
देवगड*९००*१७७*२६६*४४३
सावंतवाडी*१०००*७०*८८*१५८
वैभववाडी*४००*९१*७९*१७०
--------
चौकट
संकटापूर्वीच उपाययोजना
यावर्षीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात ६,२०० वनराई व कच्चे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करून प्रत्तेक तालुक्याला उद्दिष्ट दिले आहे. जिल्ह्यात ६२०० बंधारे बांधण्याच्या उद्दिष्टांपैकी आतापर्यंत १३४९ कच्चे व ९७१ वनराई, असे मिळून २३२० बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले.
---
तालुकानिहाय अहवाल (टक्केवारी)
कुडाळ - १०५
देवगड - ४९.२२
वैभववाडी - ४२.५०
मालवण - २२
कणकवली - १७.६०
वेंगुर्ले - १६.६०
सावंतवाडी - १५.८०
दोडामार्ग - ५
--
कोट
जिल्हा परिषद प्रशासनातर्फे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधण्यात येणाऱ्या कच्चे व वनराई बंधाऱ्यांमुळे गेली दोन वर्षे कोठेही पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली नाही. हेच या मोहिमेचे फलित आहे. त्यामुळे प्रत्येकाने बंधारे मोहिमेला सहकार्य करावे. ज्या तालुक्यात काम कमी झाले आहे, त्या तालुक्यांना फेब्रुवारी अखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्णतेच्या सूचना दिल्या आहेत.
- जिल्हा जल संधारण विभाग