राजापूर ःविज्ञान प्रदर्शनामुळे वैज्ञानिक तयार होतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःविज्ञान प्रदर्शनामुळे वैज्ञानिक तयार होतील
राजापूर ःविज्ञान प्रदर्शनामुळे वैज्ञानिक तयार होतील

राजापूर ःविज्ञान प्रदर्शनामुळे वैज्ञानिक तयार होतील

sakal_logo
By

rat23p15.jpg
77678
राजापूरः वैज्ञानिक नाटिका प्रकारातील विजेत्या कारवली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करताना आमदार राजन साळवी.
-------------
विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक तयार होतील
राजन साळवी ; कारवलीत विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांचा गौरव

राजापूर, ता. २४ ः कोकण बोर्डाच्या माध्यमातून झालेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निकालामधून कोकणातील विद्यार्थी हुशार असल्याची वेळोवेळी प्रचिती आली आहे. भविष्यामध्ये अशा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून भविष्यातील वैज्ञानिक या मातीतून निश्‍चितच निर्माण होतील, असे प्रतिपादन आमदार राजन साळवी यांनी केले.

तालुकस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या प्रतिकृतींसह विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. कारवली येथील अर्जुना माध्यमिक विद्यालयामध्ये तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शन झाले. या वेळी अर्जुना खोरे विकास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र वरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती दूर्वा तावडे, मुख्याध्यापक अशोक लोकरे आदी उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते झाले.

विज्ञान प्रदर्शनाचा निकाल अनुक्रमे असाः विद्यार्थी प्रतिकृती - प्राथमिक गट - निलम धालवलकर (ऑटोमेटिक ऑन ऑफ वॉटरंपप), अवधूत लेले (डी. सी. डस्टर), अथर्व पांचाळ (चिरा उचलणे तरफ), वैष्णवी चव्हाण (स्मार्ट झेब्रा क्रॉसिंग), माध्यमिक गट - तनिषा घाडी (प्लास्टिक बॉटलपासून बहुद्देशीय दोर), दिव्यश्री पवार, निर्मला भिडे (डीईपी डस्टबीन), शन्नू मुसाअली पिरजादे (प्रदूषणमुक्त पिठाची चक्की), ओम सरफरे (गजर यंत्रणा प्रणाली)
अध्यापक साहित्यनिर्मितीः प्राथमिक गट - श्रीकांत मुंडे (कृतीयुक्त संख्याज्ञान), प्रसाद दरडे (गणितीय कोडे), शुभांगी सागरे (मॅजिक ऑफ एज्युकेशन), माध्यमिक गट- सत्यनारायण देसाई (visual aspect of solid state), गायत्री कुळकर्णी (सजीवांमधील जीवनप्रक्रिया), एस. डी. कदम (टाकाऊ पदार्थांपासून विद्युतनिर्मिती साधने). प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर- माध्यमिक गट- गणेश जाधव (टाकाऊतून टिकावू), मिनाक्षी शेट्ये (मोबाईल लॅब), प्रवीण बाणे (युद्धजन्य परिस्थितीत आपत्कालीन व्यवस्थापन). वैज्ञानिक नाटिका- अर्जुना माध्यमिक विद्यालय, कारवली. निबंध स्पर्धा- प्राथमिक गट- अथर्व मोरे, विशाखा वावळे, मुग्धा लाड, माध्यमिक गट- क्षितिज नांदावडेकर, अमृता चव्हाण, स्नेहा कांबळे, प्रश्‍नमंजूषा स्पर्धा- जिजामाता विद्यामंदिर रायपाटण, माध्यमिक विद्यालय जुवाठी, माध्यमिक विद्यालय ताम्हाणे.