शिक्षक संघातर्फे विद्यार्थ्यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक संघातर्फे विद्यार्थ्यांचा गौरव
शिक्षक संघातर्फे विद्यार्थ्यांचा गौरव

शिक्षक संघातर्फे विद्यार्थ्यांचा गौरव

sakal_logo
By

शिक्षक संघातर्फे विद्यार्थ्यांचा गौरव
गावतळेः अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाच्या दापोली शाखेच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि दिनदर्शिका प्रकाशन, हळदीकुंकू कार्यक्रम दापोली येथे झाला. जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात शिष्यवृत्ती, नवोदय, एनएमएमएस आदी स्पर्धा परीक्षेसह इस्रो, नासामध्ये निवड झालेल्या ३५ विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक आदींचा भेटवस्तू व प्रशस्तीपत्र, रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. या वेळी अखिलचे जिल्हा सरचिटणीस संतोष देवघरकर, सल्लागार संभाजी सावंत, केशव क्षीरसागर, केंद्रप्रमुख तालुकाध्यक्ष सुनील कारखेले, अभय गुजर, महिला अध्यक्षा मानसी सावंत, मुग्धा सरदेसाई आदी उपस्थित होते.
---------------
प्रज्ज्वल सनगरेच्या तैलचित्राला पुरस्कार
संगमेश्वरः देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईन्स (डी-कॅड) कला महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील प्रज्ज्वल सनगरे याला स्टील लाईफ या विषयात राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. प्रज्ज्वल हा संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील ग्रामीण भागातील विद्यार्थी असून त्याने तैलचित्र प्रकारात हे यश मिळवले आहे. या पुरस्काराचे वितरण पुणे येथे ३ फेब्रुवारीला होणार आहे. देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईन्सतर्फे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी चित्रे पाठवली होती. यामध्ये प्रज्ज्वल याने स्टील लाईफ या विषयावर वस्तूचित्र रेखाटले होते. त्याने परडी, डाळिंब, बॉटल्स आणि ग्रामीण भागातील जार याचे रेखाटलेले हुबेहूब चित्र आकर्षणाचा विषय ठरला. याच चित्राला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातून जवळपास उत्तम प्रकारची अशी १५०० ते २००० चित्रे आली होती. त्यातून प्रज्ज्वल याच्या चित्राला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या यशाने प्रज्ज्वल याचे कॉलेजसह सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. प्रज्ज्वल याला डीकॅडचे शिक्षक मराठे, पोटफोडे, स्वप्नील परांजपे, सुयोग यांचे मार्गदर्शन लाभले.
--------
राज्याच्या हितासाठी शिवसेनेचीच गरज
दाभोळः राज्याच्या हितासाठी शिवसेनेचीच खरी गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते आणि युवासेनेचे राष्ट्रिय सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांनी आसूद येथे व्यक्त केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा सप्ताहाचा हर्णै जिल्हा परिषद गटाचा मेळावा आसूद येथे आयोजित करण्यात आला होता. त्यांनी कोणावरही टीकाटिप्पणी न करता शिवसेनेची गरज का आहे हे शिवसैनिकांना पटवून दिले. या वेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात राज्यस्तरावर खो-खो खेळणारा गिम्हवणे दुबळेवाडी येथील निहार दुबळे याच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
----------------
कुडावळेत अळंबी उत्पादनाबाबत मार्गदर्शन
दाभोळः ग्रामीण उद्योजकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय दापोलीच्या ''कृषी जागती'' आणि ''कृषी प्रणाली'' या दोन गटाणी अळंबी उत्पादनाची माहिती कुडावळे येथील शेतकऱ्यांना दिली. यामध्ये अळंबी उत्पादनाचे फायदे तसेच अळंबीचे गड्डे कसे भरावे, अळंबीला असलेली भरघोस मागणी आणि लघुद्योग म्हणून अळंबी कशी फायदेशीर आहे, याबद्दल माहिलांना माहिती दिली. कार्यक्रमाला गावातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रा. डॉ. आर. आर. राठोड तसेच डॉ. विठ्ठल नाईक, समन्वयक डॉ. संतोष वरवडेकर, प्रभारी अधिकारी डॉ. आशिष शिगवण यांनी मार्गदर्शन केले.
------------
काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतीलः मोहिते
दाभोळः काँग्रेस पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. संकटांवर मात करून यशाला गवसणी घालण्याची दैदिप्यमान परंपरा काँग्रेसला लाभली आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता न डगमगता पुन्हा चळवळ उभारेल आणि पक्षाला वैभवशाली मूळ रूपात उभा करेल, असा विश्वास दापोली तालुकाध्यक्ष भाऊ मोहिते यांनी तालुका काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आपली ताकद निर्माण करेल. त्याकरिता लवकरच प्रत्येक पंचायत समिती गणांचा दौरा सुरू करणार असून कार्यकर्त्यांची बांधणी केली जाणार आहे. या वेळी रामचंद्र कदम, जानकी बेलोसे, बशीर पेडेकर, संतोष शिर्के, सूर्यकांत यादव, अविनाश केळसकर, सुहास घटे आदी पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------