चिपळूण-महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांना बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांना बेदम मारहाण
चिपळूण-महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांना बेदम मारहाण

चिपळूण-महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांना बेदम मारहाण

sakal_logo
By

महामार्गाचे काम करणाऱ्या
कामगारांना बेदम मारहाण
चिपळुणातील घटना ; पोलिसांनी घेतले ताब्यात
चिपळूण, ता. २३ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांना फिल्मी स्टाईनने दगडफेक करत तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील शिवाजीनगर बसस्थानक परिसरात सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महामार्गावरील उड्डाणपुलाच्या पिलर उभारणीचे काम जोरदारपणे सुरू असून त्या कामाने गती घेतली आहे. हे काम करताना हे कामगार शिवाजीनगर बसस्थानक परिसरात एक पत्र्याची शेड मारुन त्याठिकाणी राहतात. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिलरच्या कामासाठी लोखंडी सळ्या क्रेनच्या साह्याने नेण्यात येत होत्या. याच दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी क्रेनच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्या कामगारांनी त्यांना मज्जाव केल्याने त्यांना राग आला. त्यांनी थेट दुचाकीवरुन उतरुन त्या कामागारांना मारहाण करण्यास सुरवात केली.
सुरवातीला झालेल्या बाचाबाचीच्या प्रकारानंतर थेट हाणामारी झाल्याने फिल्मी स्टाईलप्रमाणे त्या कामागारांवर दगडफेक करण्यात आली. यात ते कामगार जखमी झाले आहेत. तीन दुचाकीस्वारांना अनेकांनी समज देण्याचा प्रयत्न केला असता ते समजण्याच्या स्थितीत नव्हते. अखेर या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी महामार्गावर बघ्याची मोठी गर्दी उसळल्याने काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती.