सेंट्रल इंग्लिश स्कूलचे रेखाकला परीक्षेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंट्रल इंग्लिश स्कूलचे
रेखाकला परीक्षेत यश
सेंट्रल इंग्लिश स्कूलचे रेखाकला परीक्षेत यश

सेंट्रल इंग्लिश स्कूलचे रेखाकला परीक्षेत यश

sakal_logo
By

78162
सावंतवाडी : यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकवृंद.

सेंट्रल इंग्लिश स्कूलचे
रेखाकला परीक्षेत यश
सावंतवाडी ः शासकीय रेखाकला परीक्षेत सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थानी उत्तुंग यश मिळविले. प्रशालेतून एलिमेंटरीसाठी ५६, तर इंटरमिजिएटसाठी १३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. तसेच एलिमेंटरी ग्रेड परीक्षेतील विद्यार्थ्यांपैकी आम्ना गवंडी, फिदा शेख, खुशी गवस, आशय शिंदे, प्रवीण सैनी हे विद्यार्थी ''अ'' श्रेणी प्राप्त केली. तर फायजा बागवान, मरियम बागवान, सारा बेग, देवयानी सारंग, इनान बंगलेकर, जैदान शेख, रय्यान पटेल, सोहम तामाणेकर, अथर्व तुयेकर, नील रावराणे हे विद्यार्थी ''ब'' श्रेणीत उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थी सी श्रेणीत उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक कलाशिक्षक विष्णू माणगावकर यांचे सावंतवाडी मर्कझी जमात, मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ आदींनी अभिनंदन केले.