
वन्यप्राण्यांपासून फळझाड नुकसानीची भरपाई मिळणार
78192
मुंबई : येथील महसूल आणि वनविभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी आमदार नीतेश राणे उपस्थित होते.
वन्यप्राण्यांपासून फळझाड
नुकसानीची भरपाई मिळणार
आमदार राणे ः मुंबईतील बैठकीत प्रश्न चर्चेत
कणकवली, ता.२५ : वन्यप्राण्यांमुळे बागायतीची मोठे नुकसान होते. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई रक्कम मिळणार आहे. त्याअनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुंबईत बैठक झाल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली.
वन्यप्राण्यांमुळे कोकणातील आंबा, काजू, फणस, नारळ, सुपारी तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान होते. वन्य प्राण्यांकडून होणारी नुकसानी आणि त्याची भरपाई देण्याबाबत धोरण ठरविण्यासाठी महत्वपूर्ण बैठक मुंबईत महसूल आणि वनविभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली.
या बैठकीत वन्यप्राण्यापासून होणारे शेतकऱ्यांचे नुकसान, नुकसानीचे क्षेत्र, नुकसानीचे प्रमाण आदींच्या आधारे नुकसानीचे मूल्य निश्चित करण्याची कार्यपद्धती ठरविण्यात आली. या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी देवगड हापूससह सिंधुदुर्गातील हत्तीबाधित क्षेत्रात होणारी नुकसानी तसेच गवा, रानडुक्कर आदींसह अन्य वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतकऱ्यांच्या भात पिक नुकसानीचाही मुद्दा प्रामुख्याने मांडला. याबाबत सविस्तर चर्चा होऊन वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या फळझाडे, फुलझाडे तसेच शेतनुकसानीची शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळण्यासाठी कार्यपद्धतीबाबत निर्णय घेण्यात आल्याचे श्री. राणे म्हणाले.