खेड ः भोस्ते-कशेडी घाटाच्या कात्रीत भरणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः भोस्ते-कशेडी घाटाच्या कात्रीत भरणे
खेड ः भोस्ते-कशेडी घाटाच्या कात्रीत भरणे

खेड ः भोस्ते-कशेडी घाटाच्या कात्रीत भरणे

sakal_logo
By

भरणे ते कशेडी समस्याग्रस्त भाग ४ .............लोगो

फोटो ओळी
-rat२५p१.jpg ः KOP२३L७८१४९
महामार्गावरील भोस्ते घाटातील धोकादायक अवघड वळण.
-rat२५p२.jpg ः KOP२३L७८१४१ महामार्गावरील भोस्ते घाटात अद्यापही दुभाजकाचे काम सुरू आहे.
---------------
भोस्ते-कशेडी घाटाच्या कात्रीत भरणे

नियोजनाअभावी ससेहोलपट ; वाट पाहणे एवढेच नशिबी
खेड, ता. २५ ः भरणेनाक्यात चौपदरीकरणाचा घोळ दीर्घकाळ सुरू आहे. भुयारी मार्गाचे काम जोरात सुरू असले तरी त्याचे नियोजन नसल्याने या ठिकाणी वाहतूककोंडी, अपघात आणि प्रवाशांना त्रास सातत्याने सुरू आहे. भरणेपासून कशेडीकडे आणि विरुद्ध दिशेला भोस्ते घाटापर्यंत प्रवास धोकादायकच ठरत आहे. यातील भोस्ते घाटाची समस्या आणखी वेगळी आहे. चौपदरीकरणाचे काम झाल्यानंतरही तेथे अपघाताची ठिकाणे कायम आहेत. काम योग्य झाले की नाही, याबाबत मतभेद आहेत. त्यामुळे भोस्ते घाटात सुधारणा होईपर्यंत आणि कशेडीतील भुयारी मार्ग पूर्ण होईपर्यंत भरणेची कोंडी कायम आहे. हे टाळण्यासाठी उत्तम नियोजनाशिवाय पर्याय नाही. तोपर्यंत भरणेवासीय आणि प्रवाशांच्या हाती वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.
पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या घाट परिसरामध्ये काही वळणे अपघाताची ठिकाणे मानली जातात. पोलिस प्रशासन आणि बांधकाम विभागाने सर्वे करून खेड आणि पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत काही ठिकाणे ही धोकादायक ठरवली आहेत; मात्र या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी काहीच उपाययोजना केली गेले नसल्याने हीच धोकादायक ठिकाणे अपघाताचे कारण ठरू लागली आहेत. पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या घाट परिसरामध्ये अनेक धोकादायक ठिकाणे आहेत. घाटातील चोळई गावानजीक तर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. यानंतर तरी बांधकाम विभागाने त्या ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करणे गरजेचे होते; मात्र अद्याप या घाटात अपघात रोखण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली गेली नसल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच आहे. कशेडी घाटात होणारे जीवघेणे अपघात रोखायचे असतील तर या घाटाला पर्यायी मार्ग म्हणून तयार करण्यात येत असलेल्या या मार्गाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याशिवाय पर्याय नाही. या मार्गाचे काम पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला तरच या घाटातील अपघातांना आळा बसेल. (समाप्त)


चौकट
वळण न काढताच संरक्षण भिंत
महामार्गावरील भोस्ते घाटाच्या रुंदीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आहे; परंतु या घाटातील एका अवघड वळणावर सतत अपघात सत्र सुरूच आहे. या रुंदीकरणादरम्यान हे वळण काढणे गरजेचे होते; परंतु ठेकेदाराने हे वळण न काढताच संरक्षण भिंतीचा पर्याय वापरून हे वळण तसेच ठेवले आहे. त्यामुळे या घाटातील या वळणावर अपघाताची मालिका सुरूच आहे.

कोट
भोस्ते घाटातील अवघड वळण काढणे गरजेचे आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, तीव्र उतार आणि अवघड वळण यामुळे अपघात होत आहेत तर कशेडी घाटाला पर्यायी असलेला बोगदा लवकरच सुरू व्हावा.
- उत्तमकुमार जैन, सामाजिक कार्यकर्ते, खेड