
संक्षिप्त-कनेडी विद्यामंदिरचे कॅरम स्पर्धेत यश
कनेडी विद्यामंदिरचे कॅरम स्पर्धेत यश
कणकवली ः जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा कार्यकारी अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित केलेल्या कणकवली तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, श्री. तुकाराम सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
मालवण ‘रोटरी’कडून शाळेस साऊंड सिस्टीम
मालवण ः वायरी भूतनाथ शाळेच्या मागणीनुसार मालवण रोटरी क्लबतर्फे साऊंड सिस्टीम संच प्रदान करण्यात आला. रोटरी क्लबचे अध्यक्ष रतन पांगे यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापक देऊलकर यांच्याकडे संच सुपूर्द करण्यात आला. यावेळी क्लबचे सेक्रेटरी अभय कदम, माजी अध्यक्ष उमेश सांगोडकर, खजिनदार रमाकांत वाक्कर, सुहास ओरसकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ताराम मालवणकर, शाळा व्यवस्थापन समिती युवा प्रतिनिधी प्रदीप वेंगुर्लेकर उपस्थित होते.
रेखाकला परीक्षेत रेनबो अकादमीचे यश
कणकवली ः कणकवली येथील रेनबो अकादमीतील चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी व इंटरमिजेएट रेखाकला परीक्षेत यश संपादन केले. इंटरमिजेएट परीक्षेत प्रविष्ट सातही जणांनी ''अ'' श्रेणी प्राप्त केली. २८ सप्टेंबरमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. एलिमेंटरी परीक्षेत २० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील अंगराज लाड, मिहिर सावंत, उर्वी गवाणकर, आदित्य तावडे, शिवम राणे, दर्शिल सापळे, मैत्रेयी पारकर, विराज सावंत यांनी ''अ'' श्रेणी मिळवली. मैत्री पवार, पार्थ राणे, खुशी चव्हाण, ईशान नागवेकर, वेदिका सावंत, दानिश पडेलकर यांनी ''ब'' श्रेणी मिळवली.
नेताजी, बाळासाहेबांना वायंगणीत अभिवादन
आचरा ः मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या महामानवांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या संजना रेडकर, श्रीकृष्ण वायंगणकर, सचिन रेडकर, संतोष सावंत, रमेश महाजन, युगधंरा पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी जयेश परब, मीरा नाईक तसेच वायंगणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.