अखेर बांदा-नेतर्डे रस्ताकाम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर बांदा-नेतर्डे रस्ताकाम सुरू
अखेर बांदा-नेतर्डे रस्ताकाम सुरू

अखेर बांदा-नेतर्डे रस्ताकाम सुरू

sakal_logo
By

78301
बांदा ः बांदा-नेतर्डे रस्त्यावर खड्डे बुजविण्याच्या कामाबाबत सूचना देताना उपसरपंच जावेद खतीब, राजाराम धारगळकर आदी.
(छायाचित्र ः नीलेश मोरजकर)


अखेर बांदा-नेतर्डे रस्ताकाम सुरू

प्रशासनास जाग; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कार्यवाही

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ ः जोखीम कालावधी संपण्यापूर्वीच दुरवस्था झालेल्या बांदा-नेतर्डे रस्त्याची तत्काळ डागडुजी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच जावेद खतीब यांनी दिल्यानंतर आज प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच खतीब, ग्रामपंचायत सदस्य राजाराम धारगळकर यांनी उपस्थित राहत ठेकेदाराला सूचना दिल्या.
या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून तत्काळ डागडुजी करावी, अशी लेखी मागणी बांदा ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र रस्ते विकासच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली होती. येत्या १५ दिवसांत खड्डे न बुजविल्यास प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच खतीब यांनी अभियंत्यांना दिला होता. बांदा ते आरोसबाग गोवा सीमेपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. रस्ताकाम पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीतच रस्ता खराब झाला आहे. गतवर्षी मागणी केल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी केली होती. रस्त्याच्या जोखीम कालावधीची मुदत दोन महिन्यांत संपणार आहे. त्यामुळे तत्काळ कार्यवाही व्हावी, असे निवेदनात म्हटले होते. कनिष्ठ अभियंता राजाराम धर्णे यांनी तत्काळ दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र रस्ते विकास कार्यालयाच्या वतीने आज प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपसरपंच खतीब, ग्रामपंचायत सदस्य धारगळकर, शुभम साळगावकर आदी उपस्थित होते. यावेळी ठेकेदाराला खड्डे योग्य रीतीने बुजविण्याच्या सूचना देण्यात आल्या.