सर्वांगीण विकासासाठी खेळ, स्पर्धा आवश्यक

सर्वांगीण विकासासाठी खेळ, स्पर्धा आवश्यक

78405
कुडाळ ः बॅ नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी. (छायाचित्र ः अजय सावंत)


सर्वांगीण विकासासाठी खेळ, स्पर्धा आवश्यक

किशोर सोनसुरकर; नाथ पै महाविद्यालयात पारितोषिक वितरण

कुडाळ, ता. २७ ः विद्यार्थी दशेमध्ये मिळणारे यश हे चिरकाल टिकते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक कालखंडात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, खेळांमध्ये भाग घ्यावा, सहभागी व्हावे. कारण हे सर्व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन दाभोली हायस्कूलचे प्रा. किशोर सोनसुरकर यांनी केले.
प्रा. सोनसुरकर हे बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळ आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "कुठलाही अभ्यासक्रम हा सोपा नसतो. त्यामध्ये शरीर व मन एकत्र करून एकाग्रपणाने अभ्यास करावा लागतो. तरच यश संपादित होते. अभ्यासासोबतच मैदानी खेळ हे सुद्धा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत." यावेळी व्यासपीठावर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, बॅ नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या प्रा. मीना जोशी, बॅ. नाथ पै महिला व रात्र कॉलेज प्रा. अरुण मर्गज, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुरज शुक्ला उपस्थित होते. दीपप्रज्ज्वलन करून शुभारंभ झालेल्या या कार्यक्रमाची प्रस्तावना नर्सिंग प्रा. सुमन सावंत यांनी केली. नर्सिंग प्रा. मीना जोशी आणि प्रा. मर्गज यांनीही विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तणावमुक्त आयुष्य हे आजच्या जगातील सर्व माणसांची मूलभूत गरज बनली आहे. आनंदी रहा, स्वच्छंद आयुष्य जगा तरच शरीराने आणि मनाने तुम्ही सुदृढ राहाल, असे उद्गार संस्था अध्यक्ष गाळवणकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून काढले. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा हा विविधरंगी कला छटांनी भरलेला होता. २० जानेवारीच्या सायंकाळी पु. ल. देशपांडे रंगमंचावर ''इंद्रधनु हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. याला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. जी. एस. कुलकर्णी अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळचे सुपुत्र ज्येष्ठ रंगकर्मी केदार देसाई होते. सूत्रसंचालन प्रा. वैजयंती नर, नेहा महाले, कृतिका यादव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. रुगवेदा राऊळ यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व विभागाचे प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सोन्सुरकर यांना २०१७ मध्ये मिस्टर एशिया मास्टर कॅटेगरीमध्ये मानाचा पुरस्कार मिळाला आहे. ते रस्सीखेच, शरीर सौष्ठत्व आदी स्पर्धांचे जागतिक पातळीचे खेळाडू आहेत. त्यांनी यासाठी अनेकवेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याबद्दल त्यांचा सत्कार झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com