पटवर्धन हायस्कूलचे 51 विद्यार्थी अ श्रेणीमध्ये

पटवर्धन हायस्कूलचे 51 विद्यार्थी अ श्रेणीमध्ये

rat२३p२.jpg
L७७६४७
रत्नागिरी : शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये यश मिळवणारे पटवर्धन हायस्कूलचे विद्यार्थी. सोबत पुढे बसलेले मुख्याध्यापक व संस्था पदाधिकारी.
-----------
पटवर्धन हायस्कूलचे ५१ विद्यार्थी अ श्रेणीमध्ये
शासकीय रेखाकला परीक्षा; गुणवंतांचे शाळेत कौतुक
रत्नागिरी, ता. २७ : महाराष्ट्र राज्य कलासंचालनालयामार्फत सप्टेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये राज्यातून एकूण चार लाख ५९ हजार ९९५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये राज्यातून एक लाख ८० हजार ४५८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले.
एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेसाठी पटवर्धन हायस्कूलमधून ७९ विद्यार्थी बसले. या परीक्षेचा निकाल ९८.७३ टक्के इतका लागला. यात श्रीया परब, तिर्था कदम, सृष्टी पाडाळकर, सृष्टी रेवाळे, आर्यन तावडे, अंश सांडीम, श्रावणी नाईक, अक्षरा चिमुकले, तन्वी रानभरे, मृदूल आरेकर, अवधूत जोशी, अद्वैत मोरे, रुद्र विचारे, निष्ठा जाधव, अमेय अडसूळ, श्रीया शिंगाई, प्रसाद मांडवकर, मिहीर पंगेरकर, रुजल आलिम, गौरी कल्याणकर, निर्जला तेरवणकर, खुशी हातखंबकर, श्रावणी जोशी, सलोनी राडये, तनिष्क माने, सृष्टी पवार, ऋग्वेद वायंगणकर, तिर्था किनरे, श्रावणी लिंगायत, राधा गझने, चैतन्य डांगे, अंतरा शिरगांवकर, गार्गी पावसकर या तेहत्तीस विद्यार्थ्यांनी ''अ'' श्रेणी प्राप्त केली आहे. एलिमेंटरीच्या या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक रुपेश पंगेरकर आणि सौ. मुग्धा पाध्ये यांचे मार्गदर्शन लाभले.
इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेसाठी शाळेतून एकूण ५९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल ९६.९१ टक्के इतका लागला. यात आर्या भागवत, सृष्टी दुडये, मधुरा पावसकर, रिया पाटील, शिवानी मांडवकर, श्रावणी मोंडकर, स्वराली भाटकर, प्रसन्न रेवणे, श्रुती मांडवकर, अंकुर घारपुरे, वरदा गोरे, सलोनी पांचाळ, मृणाली उचाटकर, सागर खेत्री, ईशा वीर, श्वेता नागवेकर, मानसी गोरे, संचित विचारे या अठरा विद्यार्थ्यांनी ''अ'' श्रेणी प्राप्त केली. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक रुपेश पंगेरकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, उपमुख्याध्यापक श्रीकृष्ण आर्डे, पर्यवेक्षक सत्यवान कोत्रे, तुकाराम सुतार, भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्याध्यक्षा नमिता कीर, कार्यवाह सुनिल वणजू यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com