विलवडे शाळेचे स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विलवडे शाळेचे स्नेहसंमेलन,
पारितोषिक वितरण उत्साहात
विलवडे शाळेचे स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण उत्साहात

विलवडे शाळेचे स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण उत्साहात

sakal_logo
By

78718
विलवडे ः शाळा नंबर २ च्या पारितोषिक वितरणास उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.

विलवडे शाळेचे स्नेहसंमेलन,
पारितोषिक वितरण उत्साहात
बांदा, ता. २८ ः शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य केले जाईल. शाळेच्या सर्व समस्या सोडविण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही माजी उपसभापती विनायक दळवी यांनी दिली. जिल्हा परिषद शाळा विलवडे नंबर २ प्रशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा सोहळा नुकताच झाला. यावेळी दळवी यांनी स्वखर्चाने बांधलेल्या शाळा प्रवेशद्वाराचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुख्याध्यापक सुरेश काळे, सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, उपसरपंच विनायक दळवी, केंद्रप्रमुख संदीप गवस, माजगाव केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा धर्णे, अपर्णा दळवी, नारायण दळवी, अध्यक्षा रश्मी सावंत, माजी सरपंच साक्षी दळवी, उपाध्यक्षा प्राजक्ता दळवी, शाळा नंबर १ च्या मुख्याध्यापिका सुप्रिया सावंत, हायस्कूलचे मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर, माजी शिक्षक मालू लांबर, उपशिक्षक सचिन शेळके, महेंद्र सावंत, जितेंद्र दळवी, तंटामुक्तीचे अध्यक्ष नंदकिशोर दळवी, माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज दळवी, रमण सावंत, लक्ष्मण सावंत, समीर सावंत, संजय सावंत, सोनू दळवी, सुरेश सावंत, आशिका सावंत, विलास गावडे, सायली दळवी, मनाली दळवी, विश्वनाथ सावंत आदी उपस्थित होते. आबा परब, भिकाजी दळवी यांनी संगीत साथ केली. शारदा मेस्त्री यांनी मार्गदर्शन केले. सुरेश काळे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश सावंत यांनी आभार मानले.