संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

पान ५ साठी, संक्षिप्त

रेखाकला परीक्षेत आयडियल स्कूलचे यश
खेड ः येथील चाईल्ड वेल्फेअर संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड कालसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स, फुरूस या शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा (इलेमेंटरी) या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, यामध्ये सहा विद्यार्थ्यांनी ''ए''श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे. यामध्ये शारिया परकार, शर्वरी निवळकर, तस्नीम सिद्दीकी, कुणाल पवार, चरण सिंग, रिहान खैरटकर, अमान कडवेकर हे विद्यार्थी ''ए'' श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून, १४ विद्यार्थी ''बी'' श्रेणीमध्ये तर आठ विद्यार्थी ''सी ''श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या स्पृहणीय यशात शाळेचे कलाशिक्षक विशाल चिनकटे यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.


आयडियल स्कूलचे सांस्कृतिक कार्यक्रमात यश
खेड ः येथील चाईल्ड वेल्फेअर संस्था संचलित फुरुस येथील आयडियल इंग्लिश स्कूल अँड कालसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सचे विद्यार्थी अंजुमन तामिर अखलाक आयोजित इस्लामिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. खेड येथील एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल येथे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कविता गायन, प्रश्नमंजुषा, बैतबाजी, भाषण व संवाद फेक असे बहुढंगी कार्यक्रम घेण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १९ शाळांचा सहभाग होता. या चुरशीच्या स्पर्धेत संवादफेक स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामध्ये अनस तिसेकर व सिमीन तिसेकर हे विद्यार्थी सहभागी झाले होते तर कविता गायन स्पर्धेत अर्श पठाण याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.


मसिहा फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर
रत्नागिरी ः रक्तदान शिबिराचा इतिहास रचणारे सामाजिक कार्यकर्ते आणि मसिहा फाउंडेशन रत्नागिरीचे संस्थापक जकी खान यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजन केले होते. शिबिरामध्ये रक्तदात्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने रक्तपेढीतील जागा कमी पडू लागली. अखेर हे शिबिर जिल्हा रुग्णालयाच्या खुल्या जागेत घ्यावे लागले. एकावेळी तब्बल १० रक्तदाते रक्त देत होते. जकी खान यांच्या सामाजिक कार्याची दखल किंवा ते करत असलेल्या कामांची पोचपावती या रक्तदात्यांनी दिली. त्यांच्या एका हाकेला साद देत प्रचंड प्रमाणात तरुणांनी सहभाग घेतला. यामध्ये महिलांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. २०४ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. मसिहा फाउंडेशनचे संस्थापक जकी खान, अध्यक्ष तसव्वर खान, उपाध्यक्ष राशीद काझी, सचिव मंजूर शेख, खजिनदार तौहीद भाटकर यांनी आभार मानले. संकलित झालेले रक्त हे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत जमा केले. गरजू, गरीब रुग्णांना मोफत देण्यात येईल, असे खान यांनी सांगितले. या वेळी मसिहा फाउंडेशन पदाधिकारी, सभासद तसेच शहर व परिसरातील नागरिक, रक्तदाते उपस्थित होते.


आयडियल स्कूल प्रथम
खेड ः येथील चाईल्ड वेल्फेअर संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड कालसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स फुरूस या शाळेने प्रजासत्ताक दिनानिमित्त खेड कौन्सिल फाउंडेशन, खेड आयोजित देशभक्तिपर गीतगायन स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेत एकूण १५ शाळांनी सहभाग घेतला होता. चुरशीच्या स्पर्धेत आठवी ते दहावी या गटामध्ये शाळेचा विद्यार्थी जैनुद्दीन कादरी याने सादर केलेल्या ‘संदेसे आते है’ या गीतास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. प्रमाणपत्र, चषक व रोख रक्कम ३ हजार असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. हे बक्षीस खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते जैनुद्दीन कादिरी या विद्यार्थ्यास प्रदान केले. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्याला शाळेच्या पर्यवेक्षिका आयशा सनगे यांचे मार्गदर्शन लाभले.