
चिपळूण ः बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्ताने घाणेखुंटमध्ये विविध कार्यक्रम
ratchl२८२.jpg
७८६९१
चिपळूणः घाणेखुंट येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला.
---------
घाणेखुंटमध्ये मोफत तपासणी
शिबिराला प्रतिसाद
बाळासाहेब ठाकरे जयंती ; १२० महिलांनी घेतला लाभ
चिपळूण, ता. २८ ः स्त्री ही कुटुंबाची प्रमुख, ती सुदृढ तर कुटुंब सुखी. याच हेतूने खेड तालुक्यातील घाणेखुंट येथील जय भवानी मित्रमंडळ व शिवसेना शाखेच्या महिलांसाठी परशुराम हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यामध्ये महिलांची शुगर व हिमोग्लोबिन, ब्लडप्रेशर, जनरल चेकअप् करण्यात आले. या शिबिराचा १२० महिलांनी लाभ घेतला.
घाणेखुंट येथील जय भवानी मित्रमंडळ व शिवसेना शाखेच्यावतीने दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. यावर्षीही शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. महिलांसाठी आरोग्य तपासणीसह हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने गावातील सर्व वाड्यांतील महिलांनी सहभाग दर्शवला. गावामध्ये एकता, सर्वधर्म समभाव व संस्कृती याची प्रचिती या कार्यक्रमातून दिसून आली. यावर्षी ६०० महिला उपस्थित होत्या. या निमित्ताने गावातील महिला हळदीकुंकू एकमेकींना लावतात. सौभाग्याचे दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतात. महिला एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करतात. यातून सामाजिक एकोपा जोपासला जातो. याच हेतूने हा उपक्रम घेतला जात असल्याचे शाखेच्या महिलांकडून सांगण्यात आले. उपस्थित महिलांना तिळगूळ, भेटवस्तू देऊन आनंदी आयुष्याच्या व सौभाग्यवतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी सुवर्णा जाधव यांनी भेट देऊन महिलांना शुभेच्छा दिल्या.