पौष्टिक तृणधान्य प्रदर्शनातून एक लाखाची उलाढाल

पौष्टिक तृणधान्य प्रदर्शनातून एक लाखाची उलाढाल

rat२८p१२.jpg
७८७५२
रत्नागिरीः पाककला स्पर्धेत सहभागी महिलांनी बनवलेले पदार्थ पाहताना सीईओ कीर्तीकिरण पुजार.
rat२८p१३.jpg
७८७५३
नाचणीपासून बनवलेले पदार्थ.

पौष्टिक तृणधान्य प्रदर्शनातून एक लाखाची उलाढाल
नाचणीच्या पदार्थांना प्रतिसाद; ६३ महिलांनी १८० पदार्थ बनवले
रत्नागिरी, ता. २८ ः कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३ दिवसांच्या पौष्टिक तृणधान्य पदार्थ प्रदर्शनातून एक लाख रुपयांची उलाढाल झाली. यामध्ये नाचणीच्या प्रक्रिया पदार्थांसह ज्वारी, बाजरीचे पदार्थही विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या वेळी आयोजित पाककला स्पर्धेत सहभागी झालेल्या ६३ महिलांनी १८० प्रकारचे पदार्थ प्रदर्शनात ठेवले होते.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने रत्नागिरी शहराजवळील अंबर हॉलमध्ये जिल्हास्तरीय प्रदर्शन व कार्यशाळा घेण्यात आली. तीन दिवसीय प्रदर्शनात जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून आलेले बचतगट सहभागी होते. नाचणीचे पीठ, प्रक्रिया केलेले पदार्थ, तांदळापासूनचे पदार्थ, विविध प्रकारची बियाणे आदी पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. पहिल्या दिवशी पाचशे लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी उपस्थितांनी केलेल्या खरेदीमधून एक लाखाची उलाढाल झाली.
या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महिला बचतगट, महिला वैयक्तिक याप्रमाणे एकूण ६३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, वरी, कोद्रा अशा विविध प्रकारच्या तृणधान्य पिकांपासून बनवलेले नाचणीचे लाडू, नाचणी केक, कुरडी, शंकरपाळी, ज्वारीची पोटली बिर्याणी, नाचणीचे गुलाबजाम, नाचणी इडली व डोसे, वरीचे मोदक, ढोकळा, शेवया, नाचणी सत्वाची वडी, नाचणीचे मोमोज, वरीचे अनारसे, घावणे अशा प्रकारच्या १८० पदार्थांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणाला सहदिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी एम. आर. सातव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार आदी उपस्थित होते.

चौकट
प्रज्ञा फडके प्रथम
पाककला स्पर्धेत प्रज्ञा फडके प्रथम, अवनी धनावडे आणि नूपुर पास्ते अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला. पाककृती स्पर्धेचे परीक्षक उदय गोखले यांनी या कार्यक्रमाचे परिक्षण केले. स्पर्धेत संजीवनी जाधव यांची उत्तेजनार्थ निवड करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com