
कादवडच्या श्री कालभैरव मंदिरात चोरी
rat२८२५.txt
बातमी क्र. .२५ (पान ३ साठी)
फोटो ओळी
- RATCHL२८७.JPG ः
७८७७६
चिपळूण ः दानपेटीची पाहणी करताना पोलिस व ग्रामस्थ.
--
कादवडच्या श्री कालभैरव मंदिरात चोरी
चिपळूण, ता. २८ ः तालुक्यातील दसपटीतील कादवड गावचे ग्रामदैवत श्री काळभैरव मंदिरातील दानपेटी चोरट्याने फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी उघडकीस आली.
या मंदिराच्या पूर्वेकडील बाजूचा दरवाजा तोडून चोरट्याने गाभाऱ्यात प्रवेश केला. दानपेटीतील रोख रक्कम लंपास केल्याचं समोर आले आहे. दानपेटीमध्ये अंदाजे एक लाख रुपये रक्कम असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. दानपेटी मंदिराच्या शेजारील असलेला नदीपात्रात आढळून आली. या घटनेची सखोल चौकशी करून अज्ञात चोरट्याचा तपास लावून योग्य ती कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेची माहिती कादवड गावातील ग्रामस्थ बळीराम शिंदे, सतीश शिंदे, जयराम शिंदे, स्वप्नील शिंदे, चंद्रकांत शिंदे, जयवंत शिंदे, उत्तम शिंदे, अनंत शिंदे आदी ग्रामस्थांनी अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. शिरगाव पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज खोपडे व पी. एस. पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला.