
‘कोकण कला’ संस्थेकडून बांदा वाचनालयास पुस्तके
78790
बांदा ः नट वाचनालयात पुस्तके प्रदान करताना दयानंद कुबल. सोबत एस. आर. सावंत व इतर मान्यवर.
‘कोकण कला’ संस्थेकडून
बांदा वाचनालयास पुस्तके
बांदा ः वाचन ही काळाची गरज आहे. विष्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वाचनालयाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. भविष्यात वाचन संस्कृतीची चळवळ निर्माण करण्यासाठी कोकण कला संस्था निश्चितच सहकार्य करेल, असे प्रतिपादन कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी येथे केले. येथील नट वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरावडा दिनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोकण कला संस्थेतर्फे ३०० हून अधिक दुर्मिळ ग्रंथ, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा, लहान मुलांसाठी शौर्य कथा अशी पुस्तके भेट दिली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक नीलेश मोरजकर, अंकुश माजगावकर, संचालिका स्वप्नीता सावंत, शिक्षक जे. डी. पाटील, हंसराज गवळे, खानोलकर, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब आदींसह वाचक उपस्थित होते. शिक्षक जे. डी. पाटील व कास प्राथमिक शाळेच्या शिक्षिका स्वाती पाटील यांनी ‘नवी दिशा नवे उपक्रम’ हे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक पुस्तक वाचनालयाला भेट दिले. कुबल यांनी वाचनालयात दरवर्षी शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा घेण्यासाठी बक्षीस योजना जाहीर केली.
....................
78789
माणगाव ः श्लोक पठण स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसमवेत पालक, शिक्षक, संस्था पदाधिकारी.
माणगाव वाचनालयात श्लोक पठण
माणगाव ः येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयात भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त श्लोक पठण स्पर्धा झाली. माणगाव परिसरातील एकूण १० शाळांमधील ४० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. एकूण तीन गटात स्पर्धा घेण्यात आली. गटवार निकाल अनुक्रमे असा ः पहिली ते दुसरी-ओम नार्वेकर, रुद्र आंबेरकर, मैत्री धुरी, उत्तेजनार्थ ज्ञानदा पिळणकर. तिसरी ते चौथी-श्रीपाद गायचोर, लावण्या बावकर, हर्षिता राणे, उत्तेजनार्थ राधा पाडगावकर. पाचवी ते सातवी-दिव्या मेस्त्री, शिवानी शेडगे, शंकर ठाकर, उत्तेजनार्थ भावेश गावडे यांनी यश संपादन केले. स्पर्धेचे परीक्षण अपूर्वा चव्हाण, स्नेहा माणगावकर यांनी केले. संस्था सचिव एकनाथ केसरकर यांनी प्रास्ताविक केले. चव्हाण यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी संचालक दादा कोरगावकर, सदाशिव पाटील, विजय केसरकर आदी उपस्थित होते. संस्थेच्या वार्षिक बक्षिस वितरण सोहळ्यात यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.