
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाचे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश सिंधुदुर्ग पोलिस दलाचे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश
78810
सिंधुदुर्गनगरी ः वैभव नार्वेकर यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करताना पालकमंत्री.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाचे
विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश
सिंधुदुर्गनगरी ः ३३ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा पुणे येथे झाली. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र पोलिस दलातील खेळाडूंनी सहभाग घेतला. ही स्पर्धा एकूण १८ क्रीडा प्रकारांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील खेळाडूंनीही सहभाग घेत चांगले प्रदर्शन केले. या क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी प्रावीण्य मिळविले. त्यामध्ये वैभव नार्वेकर यांनी १५०० मीटर धावणेत प्रथम व ८०० मीटर धावणे द्वितीय, इंफ्रास बुथेलो याने भालाफेकमध्ये द्वितीय, अमित राणे कबड्डीमध्ये प्रथम, ज्योती कांबळे हिने कुस्तीमध्ये द्वितीय, संजीवनी चौगुले हिने खो-खोमध्ये तृतीय, रिना अंधारे हीने खो-खोमध्ये तृतीय कमांक पटकावला. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच प्रशासनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
...............
78813
जामसंडे : येथील गणपतीचे उद्योगपती नंदकुमार घाटे यांनी दर्शन घेतले.
जामसंडेत माघी गणेशोत्सवाचा उत्साह
देवगड : जामसंडे येथील सन्मित्र मंडळातर्फे माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. उत्सव काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उत्सवाचे यंदाचे ४३ वे वर्ष आहे. आज विविध धार्मिक कार्यक्रम झाले. तसेच हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी दर्शन घेतले. महिलांनी मोठी गर्दी केली होती. उद्योगपती नंदकुमार घाटे यांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी प्रवीण जोग, प्रशांत वारीक, शरद शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते. दरम्यान, उद्या (ता. २९) गणपती विसर्जन करण्यात येणार आहे.