उदय सामंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदय सामंत
उदय सामंत

उदय सामंत

sakal_logo
By

78771
कोल्हापूर ः उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे झालेल्या आढावा बैठकीत ‘सकाळ’ने मांडलेल्या उद्योजकांच्या समस्या वाचून दाखवित त्यावर निर्णय जाहीर केले.
.................................................
विकासवाडी ‘एमआयडीसी’साठी महिनाभरात भूसंपादन

उद्योगमंत्री उदय सामंत ः ७० हेक्टर जमीन घेणार, ‘सकाळ’मुळे जिल्ह्यातील उद्योगवाढीला मदत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः निर्यातीत आघाडीवर असलेल्या कोल्हापूरच्या उद्योगक्षेत्राच्या विस्ताराला बळ देण्यासाठी जिल्ह्यातील विकासवाडी येथे नवी ‘एमआयडीसी’ उभारण्यात येईल. त्यासाठी येत्या महिनाभरात तेथील शासकीय ७० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाईल. त्यापैकी २० हेक्टर जमीन लघु उद्योजकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. सीमाभागातील तरुणाईच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी शिवजयंती दिनी निपाणी येथील देवचंद कॉलेजमध्ये उद्योग विभागातर्फे रोजगार मेळावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींसमवेतच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘उद्योग विस्ताराला हवी नवी एमआयडीसी’ या वृत्ताद्वारे ‘सकाळ’ने शनिवारच्या अंकात उद्योगक्षेत्राच्या समस्या सोडविण्याबाबत भूमिका मांडली होती. त्याला बळ देत मंत्री सामंत यांनी उद्योजकांचे विविध समस्या, प्रश्‍न मार्गी लावले. ते म्हणाले, ‘उद्योगांना विजेबाबत प्रोत्साहनपर अनुदानचा टप्पा ७० टक्के कायम ठेवून ते थेट उद्योजकांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. एमआयडीसीतील पोलिसांच्या पेट्रोलिंगसाठी प्रत्येकी एक वाहन देणार आहे. राज्यात माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली काहीजण उद्योजकांना त्रास देत असून, ते यापुढे खपवून घेतले जाणार नाही. सीमाभागात वर्षभरात १२०० नवउद्योजक घडविण्याचे ध्येय आहे. त्यासाठी आतापर्यंत २६७ जणांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे.’
००००

़़‘सकाळ’ हातात घेऊन सामंत यांनी घेतले विविध निर्णय
या बैठकीत कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हर्षद दलाल यांनी उद्योगक्षेत्राचे प्रश्‍न मांडताना सुरुवातीला मंत्री सामंत यांच्या हातात ‘सकाळ’चा अंक दिला. त्यात उद्योजकांचा मांडलेला प्रत्येक प्रश्‍न वाचून मंत्री सामंत यांनी त्याबाबत निर्णय जाहीर केले. पुढील कार्यवाहीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आदेश दिले.

मंत्री सामंत म्हणाले
१) इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योजकांना अधिक चांगल्या सुविधा
२) उद्योजकांना अन्य राज्यांपेक्षा जादा प्रोत्साहनपर अनुदान देणार
३) दावोस येथे सामंजस्य करार केलेल्या उद्योगांच्या मदतीसाठी टास्कफोर्सची निर्मिती
४) या उद्योगांच्या भूसंपादनाबाबत दर आठ दिवसांनी टास्कफोर्स घेणार आढावा