टेबल टेनिस मास्टर्स स्पर्धेत राजापूरचा झेंडा

टेबल टेनिस मास्टर्स स्पर्धेत राजापूरचा झेंडा

rat२९p१३.jpg-KOP23L78899 -राजापूर ः जागतिक टेबल टेनिस मास्टर्स वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये कास्यपदक पटकाविलेले राजेश मुदम आणि अनिल रासम.

टेबल टेनिस मास्टर्स स्पर्धेत राजापूरचा झेंडा
राजेश मुदम यांची कामगिरी ; वर्ल्ड चॅम्पियनमध्ये दुहेरी मुकुट
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ ः ओमान येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेबल टेनिस मास्टर्स वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये राजापूरचे सुपूत्र राजेश मुदम यांनी कणकवली, हरकूळचे सुपूत्र अनिल रासम यांच्या साथीने दुहेरीमध्ये कास्य पदक पटकावित भारताचा तिरंगा झेंडा फडकविला आहे. जागतिक स्तरावर क्रिकेट, टेनिस या खेळांना ग्लॅमर प्राप्त झालेले असताना वेगवान खेळ म्हणून ओळखल्या जात असलेल्या टेबल टेनिस हा खेळ दुर्लक्षित आहे. मात्र, या खेळामध्ये गेली चार दशकांहून अधिक काळ विविध स्पर्धांमध्ये विविध पदकांची लयलूट करणारे राजापूरचे सुपूत्र राजेश मुदम यांनी सुमारे साठ देशांमधील २८०० स्पर्धक खेळाडूंचा सहभाग असलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये वयाच्या साठाव्या वर्षी मिळविलेले यश कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी म्हणावे लागेल.
शहरातील दिवटेवाडी येथील रहिवाशी असलेले राजेश मुदम यांचे वडील नोकरीनिमित्ताने मुंबईला असल्याने राजेश यांचे बालपणासह शिक्षण मुंबई येथे झाले आहे. कोणाचेही वैयक्तिक मार्गदर्शन नसताना इतरांचा खेळ पाहून स्वतःमध्ये कौशल्यपूर्ण बदल घडवित स्वतःला स्पर्धात्मक टेबल टेनिस खेळाडू म्हणून विकसित केलेले राजेश १९७७ पासून ते स्पर्धात्मक टेबल टेनिस स्पर्धांमध्ये सहभागी होवू लागले होते. त्यानंतर, त्यांनी आजपर्यंत अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विविध पदकांची लयलूट केली आहे. बुहन्मुंबई महानगर पालिकेचे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी असलेले श्री. मुदम यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सांघिक संघाचे नेतृत्व करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. एवढेच नव्हे तर, त्यांनी आजपर्यंत २००२ मध्ये स्वित्झर्लंड, २००४ मध्ये जपान, २००६ मध्ये जर्मनी, २०१० मध्ये चीन, २०११ मध्ये थायलंड, २०१२ मध्ये स्वीडन, २०१६ मध्ये स्पेन, २०१७ मध्ये श्रीलंका व २०१८ मध्ये अमेरीका येथे झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय, विश्वचषक यांसह आशियाई स्तरावरील टेबल टेनिस स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. सत्तर विविध देशांमधील सुमारे पाच हजार खेळाडूंचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस मास्टर्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सहभागी होत त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. हीच यशस्वी घौडदौड त्यांनी या नव्या वर्षामध्ये ओमान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस मास्टर्स चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये (६० वर्ष वयोगट) कायम ठेवली आहे.


कोट
राज्य,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होवून अनेक पदके पटकाविली आहेत. मात्र, मास्टर्स वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये पदक पटकावून भारताचा तिरंगा झेंडा फडकविण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न सहकारी अनिल रासम यांच्या साथीने या स्पर्धेमध्ये मिळालेल्या यशाने साकार झाले आहे.
राजेश मुदम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com